महाराष्ट्र
वाचन आवड च्या अध्यक्षपदी सुनिल कटारिया यांची बिनविरोध निवड
By Admin
वाचन आवड च्या अध्यक्षपदी सुनिल कटारिया यांची बिनविरोध निवड
पाथर्डी - प्रतिनिधी
वाचन आवड प्रकल्पाच्या अध्यक्षपदी श्री तिलोक जैन विद्यालयाचे शिक्षक सुनील कटारिया, उपाध्यक्षपदी विकास पालवे तर सचिव पदी महादेव कौसे यांची नुकतीच झालेल्या कार्यकारणी सहविचार सभेत निवड करण्यात आली.
मराठी भाषा प्रचार व प्रसार तसेच भाषा संवर्धन या साठी काम करणे, वैचारीक देवाणघेवाण करणे तसेच वाचन संस्कृती विषयी आवड निर्माण करणे या हेतूने शहरातील वाचन आवड संघटना गेल्या आठ- दहा वर्षांपासून काम करीत आहे. प्रत्येक महिन्यात एक सदस्य एका पुस्तकाचे वाचन करतात व महिना अखेरला वाचलेल्या पुस्तकाची माहिती देतात. नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजीत या उपक्रमात आदर्श शिक्षक भाऊसाहेब गोरे यांनी प्रेरणादायी व्याख्याते गौर गोपालदास लिखित 'जीवन समजून घेताना' या पुस्तकाबद्दल माहिती दिली.सकारात्मक जीवन जगण्याचा संदेश या पुस्तकात दिला आहे.
या नंतर वाचन आवड प्रकल्प चे मुख्य समन्वयक आदर्श शिक्षक भाऊसाहेब गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली .
यावेळी सर्वानुमते आदर्श उपक्रमशील शिक्षक सुनिल कटारिया यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या वेळी कार्यकारीणीची निवडण्यात आली.अशोक वामन - उपाध्यक्ष,विकास पालवे - उपाध्यक्ष,हर्षल धायतडक-कार्याध्यक्ष,रामनाथ शेळके-मुख्यसंघटक,महादेव कौसे-सचिव,संदीप काळे-सहसचिव, विक्रम घुले-खजिनदार,शिवाजी बडे-सल्लागार,प्रतापराव देशमुख-व्यवस्थापक,प्रदीप साळवे- सदस्य, विठ्ठल देशमुख- सदस्य,अमोल कांकरिया- प्रसिद्धी प्रमुख,प्रा. सुरेश बोरुडे-मार्गदर्शक, सचिन नागापुरे-मार्गदर्शक.
यावेळी नूतन अध्यक्ष सुनिल कटारिया यांनी नवनवीन उपक्रम राबवून, भाषा संवर्धन करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील, अशी भावना व्यक्त केली. तसेच भाऊसाहेब गोरे यांनी मार्गदर्शन करुन नुतन कार्यकारणीचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या . याप्रसंगी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री स्व. हिराबेन मोदी यांना वाचन आवड प्रकल्प पाथर्डी यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शेवटी अशोक वामन यांनी आभार मानले.
Tags :
994739
10