घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन कामाचा शुभारंभ
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील खेर्डै येथे ग्राम पंचायत मार्फत विविध विकास कामे केले जात असून आज (दि.21) रोजी
घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन कामाचा शुभारंभ करण्यात आला.या प्रसंगी सरपंच सौ. प्रतिभा अबांदास शेळके, उपसरपंच बंडु सांगळे तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. सरपंच शेळके उपसरपंच बंडू सांगळे ग्रामपंचायत सदस्य बोरु ठोंबे, भाऊसाहेब सांगळे, योगेश जेदे, ग्रामस्थ पांडुरंग सांगळे, अबांदास शेळके, रघुनाथ शेळके, वसंत ठोंबे, कैलास ठोंबे आधी उपस्थित मान्यवर यांनी नारळ फोडून कामाचा शुभारंभ केला.
घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन कार्यक्रम सुरु केल्याने गाव स्वच्छ होण्यास मदत होईल.तसेच गावातील साथीच्या रोंगाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.