माळेगाव मध्ये १० एकर उसाचे शेत भस्मसाथ,शेतकऱ्यांचे पीक जळाले
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी- तालुक्यातील माळेगाव येथे ५ शेतकऱ्यांच्या शेतातील सुमारे १० एकर क्षेत्रातील उसाच्या शेताला उच्च विद्युत वाहक तारा तुटून झालेल्या शोर्ट सर्किट मुळे आग लागून उसाचे पिक जळून भस्म साथ झाले आहे.
माळेगाव शिवारात शेतकरी रामदास पंढरीनाथ उबाळे,ज्ञानेश्वर जग्गनाथ उबाळे,रामदास जग्गनाथ उबाळे,निवृत्ती जग्गनाथ उबाळे,राउसाहेब पंढरीनाथ उबाळे या शेतकऱ्यांचा लगत असलेला १० एकर ऊस मात्र दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शेतात असलेल्या उच्च विजेच्या तारा मधील शोर्ट सर्किट मुळे आगीचे लोळ उसाच्या शेतावर पडल्याने उसाच्या शेताला अचानक आग लागली,आग लागल्याचे समजताच माळेगाव ग्रामस्थांनी आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न करत शेजारील काही उसाचे पिक वाचवण्यात यश आले परंतु १० एकर शेतातील उसाचे वाळलेले पाचट व जोराचा वारा
यामुळे आग मोठ्या प्रमाणावर भडकून उस जळून भस्म साथ झाला. पाथर्डी पालिकेच्या व वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या २ अन्गीशामक बंबाच्या मदतीने आग विझवण्याचे काम उशिरा पर्यंत सुरु होते.हाताशी आलेले शेतकरयाचे पिक जळून गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.