आमदार निलेश लंकेंचं चौथ्या दिवशी उपोषण मागं;अजित पवारांची मनधरणी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अजित पवारांची नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची माहित आहे.
Ajit Pawar Meet Nilesh Lanke : राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) विविध राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेकडं लक्ष वेधण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज चौथा दिवस होता.
दरम्यान, आमदार लंके (Nilesh Lanke) यांनी आपलं उपोषण आज मागं घेतलं आहे. अजित पवार यांच्या समजूतीनंतर लंकेंनी आपलं उपोषण सोडलं आहे. तर, अजित पवारांची नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची माहित आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेकडं लक्ष वेधण्यासाठी आमदार लंके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील करंजी, चिचोंडी पाटील, सुपा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. तीन दिवस उलटूनही प्रशासनानं निलेश लंके यांच्या आंदोलनाची दखल घेतली नसल्यानं तातडीनं प्रशासनानं याकडं लक्ष द्यावं, असं मत आमदार लंके यांच्या मातोश्रींनी म्हटलं होतं.
रस्त्यावर अनेकांचे बळी गेले आहेत, त्यामुळं तातडीनं हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे, असं शकुंतला लंके यांनी म्हटलं होतं. तर आई-वडिलांना लेकरांची काळजी असते त्यामुळं माझी आई इकडं आली असल्याचं आमदार लंके म्हणाले. मात्र, आज अजित पवारांच्या मनधरणीनंतर आमदार लंके यांनी आपलं उपोषण मागं घेतलं आहे. लंकेंचं गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरु होतं.