आयुष शेरकर याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड
"चितळी शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा."
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असणारा विद्यार्थी आयुष सचिन शेरकर इयत्ता पाचवी याची जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर ता.पारनेर येथे निवड झाली आहे.
विशेष म्हणजे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून निवड होणारा तो एकमेव विद्यार्थी आहे. तसेच तो चितळी शाळेतून निवड होणारा पहिलाच विद्यार्थी ठरला आहे. खूप मेहनत , चिकाटी आणि जिज्ञासूवृत्ती या गुणांच्या आधारे त्याने हे यश संपादन केले आहे.
त्याच्या या यशामुळे त्याचे गटशिक्षणाधिकारी अनिल भवार , केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव , सरपंच अशोक आमटे उपसरपंच अजिनाथ आमटे, ग्रा. सदस्य बाबासाहेब आमटे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक कोठुळे , उपाध्यक्ष दादासाहेब ढमाळ , बाळासाहेब कोठुळे आदींनी त्याचे कौतुक केले.
त्याला मुख्याध्यापिका संगिता बर्डे , वर्गशिक्षक राधिका खटावकर, कैलास सदामत, मेहेताब लदाफ, अनुपमा जाधव, सविता राजपूत, आणि सोनाली ससाणे, महादेव कौसे यांचे मार्गदर्शन लाभले..
सचिन शेरकर व सोनाली ससाणे या शिक्षक दाम्पत्याचा तो मुलगा आहे.