पाथर्डी- 'एटीएम' मशीनच्या बॅटर्यांची चोरी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
'एटीएम' मशीनच्या बॅटर्यांची चोरी झाल्याची घटना गुरवारी (दि.15) दुपारी उघडकीस आली. 'एटीएम' मशीन चालवणारे प्रशांत किशोर राजगुरु यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी (दि.16) पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाला.
नवीन बस स्टँड समोर शेवगाव रस्त्यालगत इंडिया वन या कंपनीचे 'एटीएम' मशीन चालविण्यासाठी राजगुरू यांनी घेतले आहे.
दुपारी अढीच वाजता पाथर्डीमधील शेवगाव रस्त्यालगत इंडिया वन कंपनीचे 'एटीएम' मशीन बंद पडले म्हणून ते पाहण्यासाठी गेलो. तेव्हा राजगुरू यांना 'एटीएम' मशीनच्या पाठीमागील इन्व्हर्टर बॅटर्या दिसल्या नाही. प्रत्येकी दहा हजार रुपये किमतीच्या 'एटीएम'च्या तीन बॅटर्या त्याची किंमत 30 हजार रुपये चोरून नेल्याचे लक्षात आले. यावरून त्यांनी फिर्याद दिली.