महाराष्ट्र
टाळ मुर्दुंगाच्या गजरांनी दुमदुमली खडकेद नगरी
By Admin
टाळ मुर्दुंगाच्या गजरांनी दुमदुमली खडकेद नगरी
काल्याचे किर्तन दिंडी सोहळाजोहार महाप्रसादाने झाली हरीनाम सप्ताह ची सांगता
कार्यक्रमासाठी सिन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांची दिंडी दरम्यान विशेष उपस्थिती
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या खडकेद गावात मोठ्या जलोशात अखंड हरीनाम सप्ताह ची दमदार सुरुवात झाली होती आज कार्यक्रमाची सांगता झाली.
सविस्तर वृत असे की पुर्वीपासुनच खडकेद हे गाव वारकरी संप्रादायीक गाव परंपरेनुसार या गावात खुप वर्षापासुन अखंड पणे सप्ताह ची परंपरा आहे.दरवर्षी खडकेद गावचा सप्ताह म्हटला की मोठ्या आनंदाने या सप्ताह कार्यक्रमात खडकेद गावासह परिसरातील ग्रामस्थ दररोज किर्तनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात.परंतु दरवर्षी काहीना काही बदल जाणवत असतो.त्या उद्देशाने खडकेद गावचे लोकनियुक्त सरपंच अरुण खतेले यांच्या नवीन संकल्पनेतुन हरीपाठाच्या वेळी गावातील सर्व मुला मुलींना एकच गणवेशात हरीपाठ घेण्याच्या दृष्टिकोनातून ऐकोप्याचे दर्शन तर झालेच परंतु विद्यार्थी देखील सांप्रदायिक क्षेञाकडे वळले यासाठी गेल्या आठ ते दहा दिवसांपासुन खडकेद येथील शाळेचे शिक्षक राजेश मोहिते,धोंगडे यांनी दररोज सराव घेत परिश्रम घेतले होते.शेवटच्या दिवशी सर्वांनी कार्यक्रमाचे कौतुक देखील केले.सकाळी 9 ते 11 काल्याचे किर्तन ह.भ.प.विजय महाराज चव्हाण यांनी केले.त्यानंतर काला करण्यात आला.संपुर्ण गावात महिलावर्गाने रांगोळी काढत दिडींचे मोठ्या उत्सहात स्वागत केले.ठिकठिकाणी महिलांनी व बालवर्गाने फुगडी घालत कार्यक्रमाची रंगत वाढवली.दिडींमिरवणुक झाल्यावर जोहार होत महाप्रसादाने कार्यक्रमाचा शेवट झाला.यावेळी प्रत्येक वर्षापेक्षा या वर्षी सर्वांनी म्हणजेच लहान थोरांनी सहभाग घेत मोठ्या उत्सहात कार्यक्रम पार पडला असेच यापुढे एकञ येऊन काम करावे.असे प्रतिपादन अखंड हरीनाम सप्ताह खडकेद येथे दिडीं सोहळ्याला उपस्थित राहुन आमदार श्री.माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी केले.तर उपस्थितीत राहिल्याबद्दल सरपंच अरुण खतेले यांनी स्वागत केले...
आमच्या खडकेद गावात दरवर्षी अंखड हरीनाम सप्ताह ची परंपरा आहे.दरवर्षी मोठ्या प्रमाणात सर्व ग्रामस्थ मोठ्या आनंदाने सहभागी होतात.परंतु यावर्षी गावातील लहान मुला मुलीनीं दररोज च्या हरीपाठामध्ये सहभागी होत कार्यक्रमाला शोभा आणत आहेत.मनापासुन आनंद होत आहे.सर्वांनी मनापासुन सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद
अरुण खतेले(सरपंच खडकेद)
Tags :
661247
10