पाथर्डी तालुक्यात ऑटो गॅरेज दुकान फोडून चोरट्यांची दिवाळी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील दत्तकृपा ऑटो गॅरेजचा पाठीमागील पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी ४०,००० /- चाळीस हजार रुपये किमतीचे दुकानातील विविध मोटरसायकलचे विविध कंपन्यांचे स्पेअर पार्ट मुद्देमाल फिर्यादीचे संमतीशिवाय चोरून नेहला असून याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी दत्तात्रय ज्ञानदेव पागर राहणार शेवगाव यांच्या मालकीचे पाथर्डी येथे दत्तकृपा ऑटो गॅरेज असून २१/१०/२०२२ ते २२/१०/२०२२ रोजी सकाळ ८ वा चे दरम्यान दत्तकृपा ऑटो गॅरेज पाथर्डी येथून अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे मालकीचे ऑटो गॅरेजचा पाठीमागील पत्रा उचकटून आतमध्ये प्रवेश करून ४०,००० /- चाळीस हजार रुपये किमतीचे दुकानातील विविध मोटरसायकलचे विविध कंपन्यांचे स्पेअर पार्ट नवे मुद्देमाल फिर्यादीचे संमतीशिवाय चोरून नेला आहे.फिर्यादीच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना.कृष्णा बडे हे करत आहेत.