पाथर्डी-राहुरी-नगर मतदार संघातील उर्वरीत पाझर तलावांची दुरुस्ती निधी मंजुरी कामासाठी प्रयत्नशील
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राहुरी मतदारसंघातील नगर तालुक्यातील कापुरवाडी व पोखर्डी येथील पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाने रु.
५ कोटी ४० लाख ५३ हजार रुपयांचा निधी मंजुर केला असल्याचे राज्याचे नगरविकास उर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
मंत्री तनपुरे पुढे म्हणाले की, मतदार संघातील नगर तालुक्यातील शेतक-यांसाठी महत्वपुर्ण वरदान ठरणा-या कापुरवाडी व पोखर्डी पाझर तलाव दुरुस्तीसाठी मंजुर रक्कम तपशिलवार पुढील प्रमाणे कापुरवाडी (गावठाण ) - ९७ लाख ३६ हजार ,कापुरवाडी (मुंजाबा ) - ७६ लाख ९० हजार , कापुरवाडी (कराळेमळा नं.1 ) - १ कोटी १६ लाख ३३ हजार , पोखर्डी (वनजमिनीजवळील) - १ कोटी २७ लाख ४८ हजार ,पोखर्डी (गावठाण) - १ कोटी २२ लाख ४६ हजार येथील पाझर तलाव दुरुस्तीसाठी एकुण ५ कोटी ४० लाख ५३ हजार चा निधी मंजुर झालेला आहे. नगर तालुक्यातील तलावांचे दुरुस्तीचे कामे ब-याच वर्षापासुन झालेले नव्हते. या तलावांची अवस्था अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसाने अतिशय बिकट झाल्याने पाणी गळतीचे प्रमाणही अधिक होते. पावसाळ्यातील पाणी साचुन गळतीमुळे तलाव लवकर कोरडे पडत होते. मंत्री तनपुरे यांचेकडे येथील लाभधारक शेतक-यांनी तलाव दुरुस्तीची मागणी केलेली होती. या मागणीची त्यांनी गंभीरतेने दखल घेवुन मंत्री तनपुरे यांनी शासन पातळीवर
वेळोवेळी पाठपुरावा करुन जलसंधारण विभागाने या तलाव दुरुस्तीसाठी निधी मंजुर केल्याने या परीसारातील शेतक-यांचे क्षेत्र ओलीताखाली येण्यास मदत होणार असुन जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. तसेच राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील उर्वरीत पाझर तलावांची दुरुस्ती निधी मंजुर करणेसाठी पाठपुरावा चालु असुन लवकरच या कामांना मंजुरी मिळण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. याकामामुळे कापुरवाडी व पोखर्डी येथील लाभधारक शेतक-यांनी मंत्री तनपुरे यांचे आभार मानुन समाधान व्यक्त केले आहे.