साखर कामगारांच्या थकीत वेतनावर निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन
By Admin
साखर कामगारांच्या थकीत वेतनावर निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन
अहमदनगर- प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या प्रश्नांबाबत साखर कारखान्यातील कामगारांच्या वेतन व सेवा-शर्ती याबाबत गठीत त्रिपक्षीय समितीस आणि शासनास शिफारस करणे,उपाययोजना सुचविणे, बंद पडलेल्या साखर कारखान्यांमधील कामगारांची थकीत देणी आदा करणे, साखर कामगारांचे थकीत वेतन आदा करण्याबाबत कार्यवाही करणे, मागील त्रिपक्षीय कराराची अंमलबजावणी न करणा-या साखर कारखान्यांबाबत निर्णय घेणे यासाठी चार सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.
राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या प्रश्नांबाबत साखर कारखान्यातील कामगारांच्या वेतन व सेवा - शर्ती याबाबत दि.12 नोव्हेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांचे अध्यक्षतेखाली त्रिपक्षीय समिती गठीत केलेली आहे. या त्रिपक्षीय समितीच्या दि.16 डिसेंबर 2020,दि.12 जानेवारी 2021 व दि.11 फेब्रुवारी 2021 अशा तीन बैठका झाल्या.
एका बैठकीला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व कामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील उपस्थित होते.कामगार संघटनांच्या प्रतिनिधीनी साखर कामगारांचे थकीत वेतन व त्रिपक्षीय समितीच्या कराराची अंमलबजावणी होत नसल्याचा घणाघात केला होता.त्यावर समिती नेमु असे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते.तयानुसार राज्याचे उद्योग,ऊर्जा व कामगार मंत्रालयाने एक समिती स्थापन केली आहे.
समिती गठीत करण्यात आलेली समिती अशी.
सदस्य सचिव:- कामगार उपायुक्त,औद्योगिक संचालनालय,मुंबई .
सदर समिती बंद पडलेल्या साखर कारखान्यांमधील कामगारांची थकीत देणी आदा करणे,साखर कामगारांचे थकीत वेतन आदा करण्याबाबत कार्यवाही करणे, मागील त्रिपक्षीय कराराची अंमलबजावणी न करणा-या साखर कारखान्यांबाबत निर्णय घेणे व महाराष्ट्रातील साखर कारखाना कामगारांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने समिती स्थापन झाल्याच्या दिनांका पासून 3 महिन्याच्या कालावधीत शिफारशींसह शासनास अहवाल सादर करणार आहे.