महाराष्ट्र
अपघातात मेंदूला मार लागलेल्या रूग्णावर 'या' हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
By Admin
अपघातात मेंदूला मार लागलेल्या रूग्णावर 'या' हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
देवासाठी पायी कावड़ीने पाणी आणण्यासाठी गेलेला अक्षय अड़ागळे याला वाहनाने धडक दिल्याने त्याच्या मेंदूला गंभीर इजा पोहोचली.घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने मुलाला वाचवा यचे कसे असा प्रश्न अक्षयच्या आईवडीलां समोर उभा राहिला.ते त्याला घेवून साईदीप हॉस्पिटलमध्ये आले.हॉस्पिट लने सर्व परिस्थिती समजून घेत अक्षयवर तातडीने उपचार केले.त्याचा सर्व खर्च साईदीप हॉस्पिटल ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आला.त्यामुळे अक्षय चांग ल्या उपचारांमुळे बरा झाला.देवासाठी कावड आणण्यासाठी ज्या श्रध्देने अक्षय गेला असेल तीच कामी आली व डॉक्टरांच्या रुपात देवच पावला अशी भावना त्याच्या कुटुंबियांनी साश्रूनयनां नी व्यक्त केली.
याबाबत अधिक माहिती अशी की,नेवासा तालुक्यातील खलाल पिंपरी गावातील अक्षय अड़ागळे व त्याचा मित्र कावडीचे पाणी आणण्यासाठी रस्त्याने पायी जात असताना भरधाव वेगाने जाणार्या टेम्पोने धड़क दिली. यात अक्षयचा मित्र जागीच मृत पावला तर अक्षयच्या मेंदुला गंभीर ईजा झाली.त्याला त्याचे वडील अर्जुन अडागळे यांनी साईदीप हॉस्पिटलमध्ये आणले.पण उपचार करण्यासाठी खूप खर्च येणार असल्याने अडागळे यांनी डॉक्टरांना सर्व परिस्थिती सांगितली.त्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ.किरण दीपक यांनी अडागळे यांना आश्वस्त करीत काळजी करू नका तुम्हाला खर्च लागणार नाही.हॉस्पिटलचे ट्रस्ट आहे.या माध्यमातून मोफत उपचार केले जातील असा विश्वास दिला.ड़ॉ.किरण दीपक,न्युरो फिजिशियन ड़ॉ.राहुल धूत,न्यूरो सर्जन डॉ.भूषण खर्चे यांच्या टीमने अक्षय वर शस्त्रक्रिया व उपचार केले.अक्षयला नेवासा येथील श्वासः हॉस्पिटल मध्ये ड़ॉ अविनाश काळे यानी वेळेवर योग्य प्राथमिक उपचार केले व १६ एप्रिल रोजी साईदीप हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.आता तो सुखरुप बरा होवून घरी परतला आहे.डिस्चार्जवेळी अर्जुन अडागळे भावना व्यक्त करताना म्हणाले
की,एकुलता एक मुलगा असल्याने आता आपले कसे होणार या विवंचनने मन उद्विग्न झाले होते.सर्व आशा संपल्या होत्या.पण डॉक्टरांच्या रुपाने आम्हाला देव पावला,असे सांगताना अर्जुन अडागळे व अक्षयच्या आईला अश्रु अनावर झाले होते.
Tags :
74697
10