महाराष्ट्र
कुणाला आमदार म्हणावं हेच कळत नाही, इंदुरीकर महाराजांचा निशाणा, व्हिडीओ व्हायरल
By Admin
कुणाला आमदार म्हणावं हेच कळत नाही, इंदुरीकर महाराजांचा निशाणा, व्हिडीओ व्हायरल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेला सुरूंग लावलाय.
यावरून राज्यातील राजकारण बरच ढवळून निघालय. सध्या राज्यात याच एका विषयावरून चर्चा सुरू आहेत. आता कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj ) यांनी आपल्या विनोदी शैलीत निशाणा साधलाय. "जगात काही राहिलं नाही. तीन दिवस झाले कोणाला काही समजेनासे झाले आहे. टीव्हीचं बटण दाबलं की, नुसत्या राजकारणाच्या बातम्या पाहायला मिळतात. तुम्ही सगळे असेच मरणार, या परिस्थितीवरून कुणाला आमदार म्हणावं हेच कळत नाही, असा टोला इंदुरीकर महाराजांनी लगावलाय. इंदुरीकर महाराजांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
चाळीसगाव येथील भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी इंदुरीकर महाराजांनी आपल्या विनोदी शैलीत राज्यातील सद्य परिस्थितीवर भाष्य केले. इंदुरीकरांनी यावेळी विनोदी शेलीतूनच नेत्यांवर देखील निशाणा साधला.
इंदुरीकर महाराज म्हणाले, "राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरून कुणाला आमदार म्हणावं हेच कळत नाही. शिवाय ज्यांच्याकडे पूर्ण तालुक्याचा कारभार आहे, त्यांना मतदान कसं करायचं हे शिकवावं लागतं. त्यासाठी आमदारांची तीन-तीन वेळा बैठक घ्यावी लागते. सध्या राज्यातील परिस्थिती झाकली मूठ सव्वा लाखाची व आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातं' अशी झालीय."
जनतेचा नुसता भरडा झालाय"
"राज्यात जे आज चाललंय ते पंचांगने सांगितले होते. कालचं आणि आजचं जे सांगितलं होतं ते पंचागामध्ये सांगितलं होतं. कुणाला आमदार म्हणावे हेच कळत नाही, या सगळ्यात जनतेचा नुसता भरडा झालाय, खुर्चीच्या लोभासाठी विरोधक देखील एकत्र आले, असे इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे.
उपस्थितांमध्ये हाशा
इंदुरीकर महाराजांनी आपल्या विनोदी शैलीने नेत्यांचे कान देखील टोचले. त्यांच्या या भाष्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला. हे असेच मरणार म्हटल्यानंतर लोक पोट धरून हसू लागले.
Tags :
47142
10