नऊ वर्षाच्या मुलाचा ढंपरमधून लोखंडी २ टनाचे प्लेट अंगावर पडल्याने मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शुभम कैलास पथवे हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
अकोले तालुक्यातील निंब्रळ येथे चालू ढंपर मधून लोखंडी २ टनाचे प्लेट अंगावर पडल्याने रस्त्याने जात असलेला ९ वर्षाचा शुभम कैलास पथवे हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
शुभम हा मुलगा शेतातून आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात घडला आहे. हा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी ढंपरच्या दिशेने धाव घेत शुभमच्या अंगावर पडलेली लखंडी प्लेट काढून तातडीने मेहेंदुरी येथील चासकर यांच्या दवाखान्यात नेले, मात्र शुभमला जास्त गंभीर इजा झाली असल्याने त्याला,
पुढील उपचारासाठी संगमनेरला हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सदर ढंपर हा निळवंडे कँनोलच्या लोखंडी प्लेटा दुसर्या ठिकानी नेत असतांना चालू गाडीतून लोखंडी २ टनाची प्लेट शुभम या लहान मुलाच्या अंगावर पडली आहे.