महाराष्ट्र
842
10
फरार असलेले २ आरोपी गजाआड; पोलिसांच्या पथकाची कारवाई
By Admin
फरार असलेले २ आरोपी गजाआड; पोलिसांच्या पथकाची कारवाई
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
मोक्का दरोडा या सारख्या गंभीर गुन्ह्यात मागील सहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींना श्रीगोंदा पोलिसांनी कोळगाव परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवत अटक करत त्यांच्याकडून ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्यांच्यावर लोणावळा, बेलवंडी, श्रीगोंदा संगमनेर पोलिसात गुन्हे दाखल दाखल आहेत.
श्रीगोंदा : मोक्का दरोडा या सारख्या गंभीर गुन्ह्यात मागील सहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींना श्रीगोंदा पोलिसांनी कोळगाव परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवत अटक करत त्यांच्याकडून ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर लोणावळा, बेलवंडी, श्रीगोंदा संगमनेर पोलिसात गुन्हे दाखल दाखल आहेत.
याबाबत सविस्तर असे की, १३ ऑगस्ट रोजी भानगाव येथील खंडू सखाराम बाबर यांच्या बंद घराचे कुलूप तोडुन रोख रक्कम व घरासमोर लावलेली दुचाकी चोरीला गेल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच अधिक तपास करत असताना कोळगाव येथील सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर काढण्या भोसले आणि अविनाश उर्फ पिट्या काढण्या भोसले यांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाली. अधिक तपास करत असताना पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना हे दोघे कोळगाव येथे असल्याचे समजले.
पोलिस उपनिरीक्षक प्रदिप बोराडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी यांना केलेल्या सुचनेनुसार कोळगाव येथील गुन्हेगारी वस्त्यांवर कॉबिंग ऑपरेशन करत ज्ञानेश्वर काढण्या भोसले आणि अविनाश उर्फ पिट्या काढण्या भोसले हे दोघे संशयित इसम मिळून आल्याने त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी भानगाव येथे घरफोडी केल्याची कबुली देत चोरलेले ५ हजार ५०० रुपये रोख तसेच चोरुन नेलेली दुचाकी क्र.एम.एच. १२ ए .एम . ३६९१ आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्र. एम . एच . १६ झेड ६२३४ असा एकूण ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपी हे जबरी चोरी, दरोडा करणारे सराईत गुन्हेगार असून त्यांनी ओढे खाडेवाडी ता.मावळ जि . पुणे या ठिकाणी ८ डिसेंबर २०१६ रोजी दरोडा टाकुन खून केला होता. त्यांच्या विरुध्द लोणावळा ग्रामिण पोलीस स्टेशन गुन्हा दाखल आहे. यातील ज्ञानेश्वर काढण्या भोसले याच्यावर लोणावळा, बेलवंडी, श्रीगोंदा, संगमनेर, नगर तालुका पोलीस स्टेशन तर अविनाश उर्फ पिंट्या काढण्या भोसले याच्यावर
लोणावळा, बेलवंडी, श्रीगोंदा पोलिस ठाण्यात खून,दरोडा, जबरी चोरी, मोक्का यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून अनेक गुन्ह्यात दोघे फरार आहेत.
ही कारवाई श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदिप बोऱ्हाडे, सहाय्यक फौजदार अंकुश ढवळे, पो. ना गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, पो. काँ दादासाहेब टाके, अमोल कोतकर, रविंद्र जाधव यांनी केली आहे .
Tags :

