परिवर्तन बहुउद्देशीय प्रतिष्ठानकडून लंपी सेंटरला १८ हजारांची मदत
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे बळीराजा फाउंडेशन तर्फे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी सुरु करण्यात आलेल्या लंपी क्वारंटाईन सेंटरला परिवर्तन बहु उद्देशीय प्रतीष्ठाण माणिकदौंडी आणि श्री तिलोक जैन विद्यालय पाथर्डी २००२ बॅचच्या माजी विद्यार्थी यांचे वतीने रोख आर्थिक व चारा स्वरुपात मदत करण्यात आली.
माणिकदौंडीच्या मंडळ अधीकारी श्रीमती वैशाली दळवी यांचे हस्ते ही मदत बळीराजा फाउंडेशनचे बाळासाहेब कर्डीले यांचे कडे बुधवारी सायंकाळी सुपुर्द करण्यात आली १०,०००/- दहा हजार रुपये रोख आणि ८१५१ रुपयांचा चारा रुपये चारा स्वरूपात ही मदत देण्यात आली.सामाजिक भावनेने जमा केलेली सर्व मदत माणिकदौंडीच्या मंडळ अधीकारी श्रीमती वैशाली दळवी यांचे हस्ते लंपी क्वारंटाईन सेंटरला सुपुर्द करण्यात आली यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी या सामाजीक उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष समीर पठाण,तलाठी राजू मेरड,मनोज खेडकर,हर्ष गवई,माणिकदौंडीचे पोलीस पाटील वसंत वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते गौतमकाका पटवा,नईमभाई पठाण,संभाजी चितळे,बबनराव पाखरे आदी उपस्थीत होते.