सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर उद्या लाँच ; शेतकऱ्यांची एक लाखाची बचत शक्य
प्रतिनिधी - नगर सिटीझन
सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर शुक्रवारी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लाँच होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एक लाख रुपयांची बचत होईल, असा अंदाज आहे.CNG-powered tractor launches tomorrow Farmers can save one lakh
देशात सध्या डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टर विक्रीस आहेत. त्याचे रूपांतर सीएनजीवर करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्यासाठी ट्रॅक्टरमध्ये परावर्तन करण्यात यश आले. सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर शुक्रवारी (ता.12 ) रोजी लाँच करण्यात येणार आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत तो लाँच होणार आहे.
मूळ डिझेलवर चालणारा ट्रॅक्टर सीएनजीमध्ये परावर्तित करण्याचे काम हे रामवत टेक्नो सोल्युशन आणि टॉसमेट्टो अचिल इंडिया यांनी केले आहे. सीएनजीवरच्या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सीएनजी हे इंधन स्वस्त असल्याने करावा लागणारा खर्च कमी होईल.
ज्यामुळे आपोआप बचत होऊन उत्पन्न वाढेल, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. सीएनजीवर ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचे वर्षाला इंधनावर खर्च होणारे 1 लाख रुपये वाचतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.