महाराष्ट्र
कांद्याला एक रुपया भाव मिळाल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin
कांद्याला एक रुपया भाव मिळाल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कांद्याचे दर उतरले आहेत. श्रीरामपूर उपबाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला अवघा एक रुपया प्रति किलो असा दर मिळाल्याने खिर्डी (ता.
श्रीरामपूर) येथील शेतकरी भारत गंगाराम जाधव (वय 35) या हतबल झालेल्या तरुण शेतकऱ्यांने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना (ता. 15) रविवार रोजी घडली. ( Attempt by a farmer to get onion at a price of one rupee )
जाधव यांनी टाकळीभान उपबाजार समितीत 40 गोण्या कांदे विक्रीसाठी आणले होते मात्र कांदा लिलाव सुरू होताच व्यापाऱ्यांनी कांदा गोणी फोडल्यावर त्यांच्या कांद्याला एक रुपया प्रति किलो असा कवडीमोल दर काढला व बोली पुढे न गेल्याने ते हतबल झाले त्यांनी बाजार समितीच्या आवारात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना समितीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. आज चौकशी केली असता त्यांची प्रकृती सुधारत आहे.
एकीकडे उसाला तोड येत नाही ती आलीच तर एकरी 10 ते 15 हजार रुपये ऊस तोडणी मजुरांना किंवा मशीनवाले यांना अगोदर द्यावे लागतात तर दुसरीकडे कांदा नो बीट होतो किंवा एक रुपया प्रति किलो दराने देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असेल तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही आणि याच विवंचनेतून माझ्या भावाने विषारी औषध प्राशन केले असावे .
- भाऊसाहेब जाधव, शेतकरी
40 गोणी मार्केटपर्यंत आणण्यासाठी मला 3300 रुपये खर्च आला व मला 1200 रुपये कांदा पट्टी मिळत होती भावाबाबत मी आडत व्यापाऱ्याला विचारले असता मला त्याच्याकडून शिवराळ भाषेत वागणूक मिळाली मला या गोष्टीचा खूप त्रास झाल्यामुळे महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना तो त्रास होऊ नये म्हणून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.
- भारत जाधव, पीडित शेतकरी.
२५ टन कांदे घेऊन भरत जाधव हा टाकळीभान येथील उपबाजार समितीमध्ये विकण्यासाठी गेला होता. अडत्याकडे त्याने कांदा दिल्यानंतर त्याला फक्त एक रुपया किलोचा भाव मिळाला. यामुळे भारत निराश आणि हताश झाल्याने त्याने बाजार समितीमध्येच विष प्राशन केल्याची घटना घडली आहे.
बाजार समितीमध्ये विष प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली होती. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी भरतला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. विष प्राशन केल्यानंतर त्याला इतर सहकाऱ्यांनी श्रीरामपूर येथील साखर कारखान्याच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी त्याची मृत्यूशी झुंज चालू आहे.
शेतकऱ्यांना पिकांना मिळत असलेल्या कमी भावामुळे अनेक शेतकरी अशाप्रकारे आपले जीवन संपवत आहेत. मात्र, राज्यात सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून हनुमान चालीसा भोंगे आणि धर्म यावरच राजकारण सुरू आहे. शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. डोक्यावर असलेल्या कर्ज घरातील इतर समस्या कशा सोडवायच्या असा मोठा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे.
Tags :
76525
10