पाथर्डी तालुक्यातील 'या' गावात आठ शेळ्यांची चोरी, गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथील शेतकरी अण्णासाहेब तबाजी गर्जे यांच्या घरा समोर बांधलेल्या बेचाळीस हजार रुपयांच्या शेळ्या चोरीस गेल्याची घटना सोमवारी घडली.
याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.
शेतीमालाला हवा तसा भाव न मिळाल्याने आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन करीत असताना चोरी झाल्याने शेतकर्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. अज्ञात चोरट्याने गर्जे यांच्या पत्र्याच्या शेडमधील बांधलेल्या आठ शेळ्या चोरल्या. पहाटे गर्जे यांनी शेळ्यांचा शोध घेतला. पण त्या आढळल्या नाहीत.या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला