महाराष्ट्र
प्रस्थापित कारखानदारांना वंचित बहुजन आघाडी पर्याय देणार- प्रा. किसन चव्हाण
By Admin
प्रस्थापित कारखानदारांना वंचित बहुजन आघाडी पर्याय देणार- प्रा. किसन चव्हाण
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील आल्हनवाडी येथे वंचित बहुजन आघाडीची घोंगडी बैठक राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच संपन्न झाली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच मच्छींद्र गव्हाणे होते. यावेळी माजी सरपंच रामदास कर्डीले, पाथर्डी तालुका वंचित बहूजन आघाडी उपाध्यक्ष संपतराव गायकवाड, राजेंद्र झाबंरे,बाळासाहेब फुंदे, अशोक कर्डीले, गोवींद खरात,रामभाऊ सत्रे, लक्ष्मण आढागळे,मछिंद्र श्रीधर सत्रे, रविन्द्र आढागळे आदी मान्यवर उपस्थित होते.
वंचित बहूजन आघाड़ीचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, शेवगांव तालुकाध्यक्ष शेख प्यारेलाल, डॉ. अंकुश गायकवाड,व वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांची मार्गदर्शन पर भाषणे झाली. कायम कुरघोडी करणाऱ्या भाजपा, राष्ट्रवादीच्या चमच्यांनी किसन चव्हाणसर यांचे जनजागृतीचे सडेतोड भाषण सुरु असतांना, गावातील दिवसा लाईट घालवली. मौजे आल्हनवाडी येथील स्वाभिमानी ग्रामस्थांनी सांगितले की, आमच्या गावामध्ये ही पोटात दुखणे असणारी पिलावळ आहे. आता आमच्या गावामध्ये वंचित बहूजन आघाड़ीची शाखा लवकरच उघडायची आहे. प्रा. किसन चव्हाण यांची घोगंडी बैठक आल्हनवाडी येथे होणार, असे कळताच दोन महीन्या पासुन बंद असलेली डीपी बसवण्यात आली. खरोखर वंचित बहूजन आघाड़ीचे कार्य अतिशय चांगले आहे. अधिकाऱ्यावर मा. किसन चव्हाण व त्यांच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा चांगला दबदबा आहे. याचे ज्वलंत उदाहरण डीपी बसवणे हे आहे, असे उपस्थित कार्यकर्ते म्हणाले.
आपल्या धारदार भाषणात प्रा. किसन चव्हाण म्हणाले की, आपले व आपल्या गावातील कोणतेही प्रलंबीत प्रश्न असतील तर, ते आम्ही योग्य पाठपुरावा करून सोडवू. आतापर्यंत पाथर्डी- शेवगाव तालुक्यातील प्रस्थापित कारखानदारांनी जनतेला गृहीत धरले होते की, लोकांनी आपले प्रश्न घेऊन वाड्यावर ,कारखान्यावर जाऊन मांडायचे परंतु आता ते दिवस संपले आहे. त्यासाठीच आम्ही वंचित चे कार्यकर्ते गावा- गावात जाऊन ग्रामस्थांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी घोंगडी बैठक अभियान शेवगाव पाथर्डी तालुक्यात सुरू केले आहे. त्यामुळे प्रस्थापित राजकारण्यांनी धास्ती घेतली आहे. यापुढे प्रस्थापित कारखानदारांना वंचित बहुजन आघाडी पर्याय देणार आहे. या पुढील सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी लढवणार आहे. या बैठकी मध्ये आपल्या समस्याचा ग्रामस्थांनी पाढाच वाचला. या बैठकीस मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व स्वाभिमानी नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन लक्ष्मण आढागळे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार राजेंद्र झाबंरे यांनी मानले.
घोंगडी बैठक संपन्न झाल्या नंतर युवा कार्यकर्ते अशोकराव कर्डीले यांच्या घरी नास्ता आणि चहापान करण्यात आले. त्यानंतर घुमटवाडी येथील शिवसेना नेते नवनाथ चव्हाण यांची प्रा. किसन चव्हाण आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली.
Tags :
48915
10