महाराष्ट्र
448
10
आगामी काळात लॉजिस्टिक पार्कचा जिल्हा म्हणून नावारूपास येणार मंत्री नितीन गडकरी
By Admin
आगामी काळात लॉजिस्टिक पार्कचा जिल्हा म्हणून नावारूपास येणार मंत्री नितीन गडकरी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यात केंद्रीय महामार्ग मंत्रालयाच्या 30 हजार कोटीच्या कामामुळे जिल्हा देशाच्या नकाशावर येणार असून आगामी काळात नगर जिल्हा लॉजीस्टिक पार्कचा जिल्हा म्हणून नावारूपास येणार, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग-61 वर अहमदनगर येथे 331.17 कोटी रुपये किंमतीच्या व 3.8 किमी लांबीच्या 4-लेन एलेव्हेटेड स्ट्रक्चर उड्डाणपुलाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डिजिटल लोकार्पण संपन्न झाले. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील देखील उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून 13 कामे पूर्ण झाली आहेत. 24 कामे प्रगतीपथावर आहेत. 6 कामे लवकरच सुरू होणार आहेत. सध्या 17 हजार 228 कोटी ची कामे सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या तीन मोठ्या ग्रीन फिल्ड हायवे मुळे नगर शहर जिल्ह्याच्या नकाशावर येणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. अहमदनगर ते पुणे या रस्त्यावर होणारी रस्त्याची कोंडी दूर करण्यासाठी 56 किमी लांबीचा डबल डेकर रोड तयार करण्यात येणार आहे. तसेच नगर कल्याण या माळशेज घाटातील रस्त्यासाठी 168 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्याने लोकार्पण झालेल्या या उड्डाणपुलामुळे स्थानिक वाहतूक व राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक विभागली जाईल, ज्यामुळे अहमदनगर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल व अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळेल. रहदारीच्या रस्त्यावरून कमी वेळात प्रवास करणे शक्य होईल. प्रवास सुरक्षित होईल तसेच वेळेची व इंधनाची बचत होईल, ज्यामुळे अहमदनगर शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असंही ते म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले की, गडकरी यांना नेहमी एक तक्रार असते की एखादा प्रकल्प रखडलाय. मात्र हा राज्यातील पहिला प्रकल्प असेल जो वेळेआधी पूर्ण झाला आहे. अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्ताने बोलताना आज उड्डाणपुलावर आतिषबाजी आणि लेझर शोचं आयोजन करण्यात आलंय, असं देखील विखे पाटील म्हणाले.
ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे' च्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील विकासाला गती मिळणार आहे. रोजगार वाढणार आहे. जिल्हा लॉजिस्टिक कॅपीटल बनणार आहे. येत्या काळात जिल्ह्यात प्रस्तावित ३० हजार कोटींच्या कामांमुळे विकासाला चालना मिळणार आहे."
असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी बांधलेला अहमदनगर शहरातील ३ किलोमीटर लांबी असलेल्या चौपदरी उड्डाणपूलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज झाले.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, महापौर सौ. रोहीणी शेंडगे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार राम शिंदे, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, स्नेहलता कोल्हे आदी उपस्थित होते.
.गडकरी म्हणाले, मुंबई ते दिल्ली पासून बांधण्यात येणाऱ्या 'ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे'मुळे पुढील काळात अहमदनगर देशाच्या नकाशावर येणार आहे.सुरत-नाशिक-नगर-सोलापूरमार्ग चेन्नईला जाणाऱ्या नवीन 'ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे' ची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी १४१ किलोमीटर आहे. ८० हजार कोटींचा हा प्रकल्प आहे.
त्यामुळे नगर जिल्ह्यात जेथे शक्य असेल तेथे लॉजिस्टिक पार्क उभारणे शक्य आहे. त्यामूळे नगर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. एक्सीस कंट्रोलने हा महामार्ग बांधत आहोत. सध्या याची लांबी १६०० किलोमीटर आहे. मुंबई पुण्यासह ठाणे, कोल्हापूर, सोलापूरची देखील सर्व वाहतूक कमी होईल अंतर आणि प्रदूषणही कमी होईल. हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी पर्यायाने अहमदनगर साठी महत्त्वपूर्ण ठरेल.
असा विश्वास श्री.गडकरी यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, अहमदनगर उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी दिवंगत खासदार दिलीप गांधी यांनी बराच पाठपुरावा केला त्यानंतर युटीलिटी शिफ्टिंग, लष्करी परवानग्यांसाठी खासदार डॉ.सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांनी प्रयत्न केले.
नवीन पुणे - औरंगाबाद महामार्गाचे काम येत्या काळात केले जाईल. सध्याच्याा पुणे-अहमदनगर मार्गावर वाघोली शिक्रापूर, रांजणगांव एमआयडीसी ,शिरुर या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी होते ती टाळण्यासाठी रामवाडी -वाघोली ते शिरूर दरम्यान 56 किलोमीटरचा महामार्ग उपलब्ध होणार आहे.
यातून वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. शेतकऱ्यांनी काळाची पावले ओळखून आपल्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. साखर कारखानादारांनी आता अधिक साखर उत्पादन न घेता इथेनॉलचा उत्पादनाकडे वळले पाहिजे. असेही श्री. गडकरी यांनी सांगितले.
Tags :

