पाडळीत विद्यार्थ्यांना पायी दिंडी सोहळा विठ्ठल भक्तीने रंगला
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांनी गावातून पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
त्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सुंदर असा आकर्षक वेष परिधान केला होता.विठ्ठल,रुखमिणीचा पोशाख करुन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घडवले.
हातात टाळ, पताका,झेंडे घेऊन शाळा ते विठ्ठल रुख्मिणी मंदिर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी विद्यार्थी,शिक्षक यांनी
रिंगण करत, फुगडी खेळत मोठ्या उत्सवात दिंडी सोहळा साजरा केला.यामुळे गावातील परीसर विठुरायाच्या भजनाने दुमदुमाला.
त्याप्रसंगी संस्थेचे सचिव कुशल भापसे व सर्व शिक्षक , ग्रामस्थ ,पालक,विद्यार्थी उपस्थित होते.