फोटो व्हायरल करणा-या 'या' व्यक्तीसह छळ करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पत्नीचा छळ करत तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल करणाऱ्या पतीसह सासू, सासरे आणि नणंद अशा चौघांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील भिलवाडे येथील संबंधित फिर्यादी विवाहितेचे सासर असून पाचोरा तालुक्यातील माहेर आहे. सासरी असतांना या विवाहित महिलेचा कौटुंबिक छळ झाल्याचा आरोप आहे. याशिवाय तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो तिच्या पतीने समाज माध्यमांमध्ये व्हायरल केल्याचा देखील आरोप विवाहितेने केला आहे.
या प्रकरणी कौटुंबिक हिंसाचार, विनयभंग, आयटी अँक्ट आदी कलमाखाली चौघांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा तपास पो.नि. प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.