दोन दुचाकीच्या समोरासमोरील धडकेत चारजण जबर जखमी, रुग्णवाहिका दहा मिनिटात हजर
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी शिवारात दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात चार जण जबर जखमी झाले.
घटनास्थळावरून १०८ पाथर्डी लोकेशनला फोन येताच तात्काळ दहा मिनिटात रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली, त्यामुळे वेळेवर रुग्णांना पुढील उपचार मिळाला.
चार रुग्णांपैकी ३ रुग्णांच्या पायाला जबर दुखापत झाली होती. १०८ चे डॉ. संतोष तुपेरे आणि पायलट ज्ञानेश्वर गोल्हार यांनी तात्काळ रुग्णांना रुग्णवाहिकेमध्ये बसवून योग्य ते प्राथमिक उपचार करुन रुग्णवाहिका उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी येथे आणली.
लोकांचा जमाव खूप संख्येने होता. उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. मनीषा खेडकर आणि त्यांचे सहकारी व १०८ च्या टीमने सहकार्य करून पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना हलवण्यात आले. १०८ टीमच्या जिल्हा व्यवस्थापक डॉ. सुवर्णमाला गोखले व कांचन बिडवे- आहेर यांचे आदेशानुसार मास कॅज्यूलटी असल्यामुळे रुग्णांना नगर रुग्णालयात सोडविण्यात आले. दोन रूग्णांना पाथर्डी येथील १०८ चे डॉ. संतोष तुपेरे तर तिसगाव चे डॉ. निलेश शिंदे एका रुग्णास तात्काळ हलविण्यात आले, त्यामुळे बीव्हीजी ची १०८ रुग्णवाहिका एक प्रकारे देवदूत ठरत आहे.