महाराष्ट्र
समाजातील वंचित घटकांसाठी काम करण्यातच खरे समाधान – अरुण मुंडे
By Admin
समाजातील वंचित घटकांसाठी काम करण्यातच खरे समाधान – अरुण मुंडे
पाथर्डी प्रतिनिधी
केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना ही खऱ्या अर्थाने जेष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच वंचित घटकांसाठी एक कल्याणकारी योजना असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या माध्यमातून दिव्यांगांचे जीवन प्रकाशमय करण्याचे काम केले आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तसेच मतदारसंघातील कोणीही लाभार्थी वंचित राहू नये या दृष्टीने ही योजना राबविली आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असून समाजातील वंचित घटकांसाठी काम करण्यातच ते खरे समाधान मानतात, असे प्रतिपादन अहमदनगर दक्षिणचे भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केले.
ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये वयोश्री योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थी जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना मोफत सहाय्यक साधने वाटप प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मा. नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, मा. उपनगराध्यक्ष बंडूशेठ बोरुडे, अजय रक्ताटे, नगरसेवक रमेश गोरे, बबन सबलस, दत्ताशेठ सोनटक्के, प्रतिक खेडकर, ज्ञानेश्वर कोकाटे, डॉ. सचिन गांधी, डॉ. दिपक जायभाये, डॉ. जगदीश मुने, डॉ. अनिरुद्ध देशमुख, डॉ. सुरेश पाटील, डॉ प्रसाद भापकर, डॉ. हंडाळ, आप्पा बोरुडे आदी उपस्थित होते.
मा. नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी यावेळी खासदार डॉ. सुजय विखे राबवीत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. खा. डॉ. सुजय विखेंच्या प्रयत्नातून पाथर्डी शहर व तालुक्यात अनेक प्रलंबित कामे मार्गी लागली असून त्यांनी मतदारसंघात उपलब्ध करून दिलेल्या १२ अद्यावत रुग्णवाहिकांमुळे तसेच कोरोनाच्या महाभयंकर लाटेत सर्वसामान्य रुग्णांना रेमडीसिवर इंजेक्शन मिळवून दिल्याबद्दल अनेक रुग्णाचे प्राण वाचले याचा आवर्जून उल्लेख केला. डॉ. सुजय विखेंच्या रुपाने या मतदारसंघाला कर्तव्यदक्ष खासदार लाभला असे ते शेवटी म्हणाले.
यावेळी जनसेवा फौंडेशन अंतर्गत पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब दत्तक योजनेच्या माध्यमातून आल्हनवाडी येथील हौसाबाई राजेंद्र पवार या महिलेस ५० हजार रु. अर्थसहाय्य देण्यात आले तसेच तालुक्यातील दिव्यांगाना वयोश्री योजनेमार्फत साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. नगराध्यक्ष अभय आव्हाड, सुत्रसंचालन डॉ. अभिमन्यू ढोरमारे तर आभार नगरसेवक रमेश गोरे यांनी मानले.
Tags :
439
10