महाराष्ट्र
दादापाटील राजळे महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार
By Admin
दादापाटील राजळे महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार
विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप व 101 वृक्षांचे रोपण कार्यक्रम
पाथर्डी- प्रतिनिधी
स्व. दादापाटील राजळे (भाऊ) यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गुरूवार दि.30जून रोजी दादापाटील राजळे महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार,विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप व 101 वृक्षांचे रोपण कार्यक्रम
पाथर्डी तालुक्याचे भाग्यविधाते सहकार व शिक्षण महर्षी स्व. दादापाटील राजळे यांच्या १६ वे पुण्यस्मरण निमित्त दादापाटील राजळे महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप व १०१ वृक्षांची लागवड करण्यात आली. यानिमित्त शिक्षण संस्थेचे विश्वस्त मा. राहुलदादा राजळे यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये शिक्षण क्षेत्रात तसेच औद्योगिक क्षेत्रात उंच भरारी घ्यावी आणि हेच भाऊंच्या विचारांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल असे सांगितले. तसेच महाविद्यालयात होत असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाची प्रशंसा केली. संस्थेचे विश्वस्त माननीय श्री उद्धवराव वाघ यांनी पाथर्डी सारख्या दुष्काळी तालुक्यात विकासाची गंगा स्वर्गीय भाऊंनी आणली व ती पुढे नेण्याची काम आजच्या तरुण पिढीने केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. रामकिसन काकडे यांनी दादापाटील राजळे (भाऊ) यांच्या स्मृतीस उजाळा देऊन त्यांच्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटी ठेवावी असे अध्यक्षीय मनोगत आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर यांनी केले. याप्रसंगी त्यांनी भाऊंच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी भाऊंच्या जीवनाचा आदर्श समोर ठेवावा. असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बारावी कला,विज्ञान व वाणिज्य या परिक्षेमध्ये पहिले तिन आलेल्या विद्यार्थ्यांचां व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे होतकरू विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत महाविद्यालय परिसरामध्ये 101 वृक्षांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यानिमित्त शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. आप्पासाहेब राजळे,विश्वस्त मा. सुभाषराव ताठे, मा. नारायणतात्या काकडे, बाळासाहेब गोल्हार, मा. श्री. श्रीकांत मिसाळ, मा. शेषराव ढाकणे, मा. कोंडीराम नरोटे,मा.शरद अकोलकर मा.अनिलराव फलके,मा.कुशिनाथ बरडे, मा.जे.आर.पवार, मा.भास्करराव गोरे,मा. आर. वाय. म्हस्के, मा. वसंतराव भगत प्राचार्य डॉ युवराज सुर्यवंशी,हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. इंगळे तर आभार डॉ. जनार्धन नेहुल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्टाफ सेक्रेटरी डॉ. अतुलकुमार चौरपगार, प्रा. अशोक काळे, डॉ साधना म्हस्के,डॉ. संजय भराटे, प्रा. आसाराम देसाई, प्रा. अस्लम शेख व सर्व महाविद्यालयीन सर्व सेवक, यांनी परिश्रम घेतले.
Tags :
3143
10