अहमदनगर जिल्ह्यातील या आमदारांकडून राम मंदिरासाठी पाच लाख
अहमदनगर- प्रतिनिधी
प्रभू श्रीराम यांचे मंदिर आयोध्यात उभारण्यात येणार आहे त्यासाठी मोठी जय्यत तयारी सुरू आहे विविध भागातून या मंदिरासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे .
अनेक संघटना, सेवाभावी संस्था सर्वसामान्य नागरिक या मंदिरासाठी चिनी मदत करतात तरी त्यामध्ये राजकीय नेतेही मागे राहिलेली नाही.
अहमदनगर जिल्ह्यातील आमदार संग्राम जगताप यांच्या कुटुंबियांच्या वतीने आयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरासाठी पाच लाख रुपयांची देणगी शुक्रवारी देण्यात आली.
विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्म प्रसार सह प्रमुख डॉ. मिलिंद मोभारकर यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सहप्रमुख दादा वेदक यांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली.
आयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरासाठी निधी संकलित करण्यात येत असल्याबाबत मोभाकर यांनी माहिती दिली. आमदार संग्रा जगताप यांनी राम मंदिर निर्माणासाठी पाच लाखांच्या निधीचा धनादेश पदाधिकार्यांच्या उपस्थित संपूर्त केला.