महाराष्ट्र
461
10
शेतकरी खचला असताना तुम्ही सत्कार स्वीकारता?"
By Admin
शेतकरी खचला असताना तुम्ही सत्कार स्वीकारता?" आमदार निलेश लंकेंचा राधाकृष्ण विखे पाटलांना सवाल
शरद पवार हे तुमच्यासारखा हेलिकॉप्टरने दौरा करत नाहीत.-आ.लंके
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
एकीकडे शेतकरी (Farmer) खचला असताना सत्कार तुम्ही सत्कार स्वीकारता हे योग्य नाही अशी टीका आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर केली आहे.
राधाकृष्ण विखेंच्या शरद पवारांवर केलेल्या टीकेचा आमदार निलेश लंकेनी समाचार घेतलाय.
शेतकरी खचला असताना तुम्ही सत्कार स्वीकारता?
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेवगाव आणि पारनेर तालुक्यात नुकसानीची पाहणी केली, त्यांच्या या दौऱ्यावरून पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी जोरदार टीका केली आहे. राधाकृष्ण विखे यांचा दौरा म्हणजे केवळ पर्यटन दौरा असल्यासारखा होता. अतिशय धावता आणि दोन तासात त्यांनी दौरा केला. त्यातच दौऱ्यादरम्यान हार तुरे स्वीकारले हे योग्य नाही, एकीकडे शेतकरी खचला असताना सत्कार तुम्ही सत्कार स्वीकारता हे योग्य नाही अशी टीका आमदार निलेश लंके यांनी केलीये.
शरद पवारांवर केलेल्या टीकेचा समाचार
राधाकृष्ण विखे यांनी भु-विकास बँकेच्या कर्जमाफीवरून शरद पवारांनी सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, ही सर्व कोत्या मनाची लोक आहेत अशी टीका केली होती. राधाकृष्ण विखेंच्या याच टीकेचा आमदार निलेश लंकेनी समाचार घेतलाय. शरद पवार हे तुमच्यासारखा हेलिकॉप्टरने दौरा करत नाहीत, त्यांच्यावर टीका करण्याची तुमची उंची नाही असं मला वाटतं असा घणाघात आमदार लंके यांनी केलाय.
शेवगाव आणि पारनेर तालुक्यात नुकसानीची पाहणी केली, त्यांच्या या दौऱ्यावरून पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी जोरदार टीका केली आहे. राधाकृष्ण विखे यांचा दौरा म्हणजे केवळ पर्यटन
दौरा असल्यासारखा होता. अतिशय धावता आणि दोन तासात त्यांनी दौरा केला. त्यातच दौऱ्यादरम्यान हार तुरे स्वीकारले हे योग्य नाही.
Tags :

