माणिकदौंडी सोसायटीच्या चेअरमनपदी आलमगीर पठाण,व्हा. चेअरमन भास्कर गर्जे
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी विविध कार्यकारी सेवा सोसयटीच्या चेअरमनपदी आलमगीर पठाण यांची तर व्हाईस चेअरमनपदी भास्कर सावळेराम गर्जे यांची बिनविरोध निवड झाली.
या सेवा संस्थेची निवडणूक या पूर्वीच पार पडली असून आमदार मोनिका राजळे समर्थक असलेल्या रावसाहेब मोरे व शिवाजी मोहिते यांच्या दोन्ही गटात ही निवडणूक होऊन त्यात मोरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने १३ पैकी १३ जागा जिंकत सोसायटीची सत्ता एकमुखी ताब्यात घेतली होती.
सहायक निबंधक कार्यालयात चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवडणूक होऊन त्यात पठाण व गर्जे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडणुकीत विजयी झालेले संचालक पुढील प्रमाणे- रावसाहेब मोरे,आलमगीर पठाण,अंकुश चितळे,सीताराम चव्हाण,भास्कर गर्जे,भाऊसाहेब जिवडे,सुभाष बोरसे,नवनाथ पवार,अंबादास चितळे,भाऊसाहेब कांबळे,अंजनाबाई आंधळे,शहाजनबी पठाण,मीराबाई राठोड हे विजयी झाले असून विजयी संचालकांचे शायद पठाण,संजय चितळे,जनार्धन वाघ,मिठू बडे,विष्णू कोठे,रभाजी गर्जे,लक्ष्मण राठोड,राजू बोरसे यांनी अभिनंदन केले आहे.