पाथर्डीत 'या' ठिकाणी ९३ हजाराचा ऐवज लंपास करत चोरी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील काळे वस्ती येथे १२ ते १३ मे दरम्यान घरफोडीची घटना घडली.सौरभ नवनाथ काळे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
घरातील सामानाची उचकापाचक करत रोख रक्कम सोन्याचे व चांदीचे दागिने असा ऐकूण ९३ हजाराचा ऐवज लंपास केला. ९० हजाराचे सोने तर ३००० हजाराच्या रोख रकमेचा चोरीमध्ये समावेश आहे.
सौरभ काळे यांच्या फिर्यादीनुसार पाथर्डी पोलिस ठाण्यात भादविक कलम ४५७,३८०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.ना.शेकडे हे करत आहेत.