बांठीया आयोगाचे पाथर्डी शहरात वंचीत बहुजन आघाडीच्यावतीने जल्लोषात स्वागत
पाथर्डी- प्रतिनिधी
सुप्रिम कोर्टाने बांठिया या आयोगाचा अहवाल स्वीकारून ओबीसी समजाला जे आरक्षण दिले, त्यामुळे त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. अनेक दिवसांपासून रखडलेल्या या आरक्षणाचा निकाल लागल्याने मनाला खरंच आनंद होत आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भोरू म्हस्के यांनी बोलतांना सांगितले.
ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला, त्यामुळे या निर्णयाचे स्वागत वंचित बहूजनचे भोरू म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली सकाळी हजारोच्या संख्येने वसंतराव नाईक चौकापासून (तिन हात चौक) जल्लोषात निघालेल्या फेरीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सांगता करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की, जय... , सर्व संतन की, जय... वंचित बहुजनांचा विजय असो... अशा घोषणा देण्यात आल्या. यामध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. वसंतराव नाईक चौकामध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली.
यावेळीं वंचित बहुजनचे तालुकाध्यक्ष भोरू म्हस्के , महेश पवार , रामभाऊ जाधव , आकाश वारे , संतोष पवार , दिलावर बागवान , बंटी नवगिरे, वाहिद शेख , कैलास धनवट, सनी दिनकर , सचिन डांगे ,गोरक्ष बांगर , महादेव दिनकर ,सोपान भिंगारदिवे, अंबादास डोंगरे, अक्षय जायभाये , सागर पैठणकर , चिकू खेडकर, बन्सी नांगरे, सचिन गिरी , बाबासाहेब चव्हाण , श्रीकांत भोसले, अरुण थोरात आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.