महाराष्ट्र
वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
By Admin
वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
पाथर्डी- प्रतिनिधी
शासनाच्या निर्णया प्रमाणे एफआरपी दिली जाते.यामध्ये कारखाना प्रशासन व संचालक मंडळ कोणताही बदल करत नाही.वृद्धेश्वरने नेहमीच परीसरातील इतर कारखान्याच्या बरोबरीने भाव दिला असून या हंगामात प्रारंभी २४२५ रुपये प्रति टना प्रमाणे एफआरपी एकरकमी दिली होती. आता यामध्ये वाढ होऊन या हंगामातील एफआरपी २५०६ रुपये एवढी आली आहे.यामुळे गाळप केलेल्या ऊसाला प्रतिटन ८१ रुपयाचा फरक दसरा या सणानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.अशी माहिती आ.मोनिकाताई राजळे यांनी सभेत दिली.
पाथर्डी तालुक्याची कामधेनु असलेल्या आदिनाथनगर येथील श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची ५१ वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्य स्थळावर कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे,जे.आर.पवार,
भाजपचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर,जि.प.सदस्य राहुल राजळे,संचालक उद्धव वाघ,सुभाष ताठे,सुभाष बुधवंत,बाळासाहेब गोल्हार,अॕड.अनिल फलके,साहेबराव सातपुते,शरद अकोलकर,डाॕ.यशवंतराव गवळी,शेषराव ढाकणे,सिंधुबाई जायभाये,कुशिनाथ बर्डै,कोंडीराम नरोटे,नारायण काकडे,चारुदत्त वाघ,पोपटराव आंधळे,सुभाष बर्डै,भास्कराव गोरे आदीसह संचालक ,सभासद,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.मोनिका राजळे म्हणाल्या की,वार्षिक सभेमध्ये सभासदांनी मांडलेल्या सुचनांचे पालन केले जाईल.मागील वर्षाच्या गाळप हंगामात ऊस तोडणीसाठी उशिर झाल्याने कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्याची मागणी होत आहे.माञ पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील पाटपाण्याचा भाग वगळता इतर भाग आजही दुष्काळी आहे.मागील हंगामात कारखाना मशनरीमध्ये बदल केल्याने हा हंगाम यशस्वी पार पडला.ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्या आहेत.ज्या शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारी आल्या आहेत.त्यांना मजुरांनी घेतलेली रक्कम परत दिली जाईल.
अल्पमुदत कर्जाला उशीर झाल्याने इथेनाॕल स्वप्न पुर्ण करण्यासाठी मागील वर्षा प्रमाणे यावर्षीही प्रतिटन १२५ रुपये प्रमाणे ठेव म्हणून रक्कम कपात केली जाणार आहे.या रकमेला ९ टक्के दराने व्याजही दिले जाते.गाळप हंगाम सुरू करण्यासाठी एफआरपीची रक्कम पूर्ण करणे गरजेचे आहे.कारखान्याची क्षमता एक हजार मेट्रिक टनाने वाढली पाहीजे.माञ त्यासाठी भागभांडवल,स्वनिधी उभारावा लागेल माञ हे करताना 'अंथरुण पाहून पाय पसरावे लागतात.ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संचालक मंडळावर जो विश्वास टाकला आहे.त्याला तडा जावू दिला जाणार नाही.ऊस क्षेत्र वाढले माञ गाळप क्षमता मॕच होत नाही.शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गाळप होण्यासाठी कारखाना प्रशासन व संचालक मंडळाकडून सर्व प्रयत्न केले जातील.सभेचे प्रास्तविक प्रभारी कार्यकारी संचालक आर.जे.महाजन,ताळेबंद अहवाल वाचन ह
संभाजी राजळे,सुञ संचालन आर.बी.शेख व समारोप श्रीकांत मिसाळ यांनी आभार मानले.
Tags :
82957
10