वडापाव विक्रेत्याच्या मुलीला वाॕशिंग्टन बॕकेत नोकरी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील गांधीनगर भागातील सर्वसामान्य कुटुंबातील भाग्यश्री ज्ञानेश्वर वाल्डे हिची बँक ऑफ अमेरिका वॉशिंग्टन डीसी येथे सिनियर टेक असोसिएट अंडर सॉफटवेअर डेव्हलपर म्हणून निवड झाली आहे. याबद्दल तिचा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सहकारमहर्षि कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, विनोद राक्षे, दिपक चौधरी आदि उपस्थित होते.
भाग्यश्री हिचे दहावी पर्यंतचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयात झाले. त्यानंतर आयटी डिप्लोमा संजीवनी इंजिनियरींग कॉलेज, तर बी-टेकचे शिक्षण मुंबई येथे झाले. परिसर तिची वार्षिक ३२ लाख रूपये पगारावर निवड झाली आहे. तिची आई सोनल ही भाजीपाला विक्रीचा तर वडील ज्ञानेश्वर वाल्डे हे वडापावची गाडीतून चरितार्थ चालवितात.