महाराष्ट्र
भेसळयुक्त दुधाचा केला पर्दाफाश, पोलीस व अन्न व औषध प्रशासनाचा संयुक्त छापा
By Admin
भेसळयुक्त दुधाचा केला पर्दाफाश, पोलीस व अन्न व औषध प्रशासनाचा संयुक्त छापा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा परिसरातील जांभळे येथे एका दुधसंकलन केंद्रावर दुधात भेसळ करून भेसळयुक्त दूध विक्रीचा गोरखधंदा सुरु होता या भेसळीच्या गोरख धंद्याचा पर्दाफाश आज छापा टाकून करण्यात आला दूध भेसळीचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला
अकोले पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करत या गोरख धंद्याचा पर्दाफाश केलादुधातभेसळ करणारा केंद्र चालक योगेश धोंडिभाऊ चव्हाण हा दुधात भेसळ करुन इतर ठिकाणीं दूध संघांना भेसळयुक्त दुधाचा पुरवठा करत होतापोलिस व अहमदनगर अन्न व औषध विभागाने छापा टाकून योगेश धोंडिभाऊ चव्हाण यास ताब्यात घेत त्याच्याकडील दूध भेसळीचे साहित्य जप्त केले आहे
अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बढे व अकोले चे प्रभारी पोलिस निरीक्षक मिथुन घुगे,उपनिरीक्षक हांडोरे बी.बी.यांच्या पथकाने ही कारवाई केली अकोले तालुक्यातील जांभळे येथील शिंदेवाडी तील योगेश चव्हाण हा दुधात भेसळ करत असल्या च्या गुप्त माहिती मिळाल्यानंतर आज बुधवार दि.२२ सप्टेंबर रोजी सकाळी योगेश चव्हाण यांच्या घरी छापा मारला
योगेश चव्हाण यास ताब्यात घेवुन त्याने त्याचे राहते घरी तयार केलेले 28 लिटर 700 रुपयांचे बनावट दुध, बनावट दुध तयार करण्यासाठी वापरलेले 15 लिटर लिक्वीड 2025/- रुपयांचे व दोन प्रकारच्या पावडर 371 किलो 52,432/- रुपये असे एकुन 55,720/- रुपयांचे बनावट दुध बनवण्याचे
साहीत्य जप्त केले
तसेच त्याचे मालकीचे मे.संघ केंद्र शिंदेवाडी,मु. जांभळे.पो. बदगी ता. अकोले या ठिकाणी छापा टाकुन बनावट दुध तयार करणारा योगेश धोंडीभाऊ चव्हाण रा.जांभळे रोड. शिंदेवाडी याने तयार केलेले 998 लिटर 24950/- रुपयांचे बनावट दुध, असे एकुन 80,670/- रुपयांचे भेसळीचे दुध व साहीत्य् असा मुददेमाल जप्त् करुन त्यातुन तपासनीसाठी नमुने घेवुन राहीलेला सर्व दुध साठा नष्ठ करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी अन्न् व औषध प्रशासनाने जप्त केलेले बनावट दुध तयार करण्याचे साहीत्य व नमुने पुढील तपासनीसाठी प्रयोग शाळेत पाठविणार असल्याची माहीती अन्न् सुरक्षा अधिकारी श्री पवार यांनी दिली असुन सदर अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रभारी पोलीस अधिकारी मिथुन घुगे यांनी सांगितले
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील व अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल मदने, यांचे मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस स्टेशन सपोनि मिथुन घुगे, पोसई भुषन हांडोरे, पो ना बाबासाहेब बडे, विठठल शेरमाळे, रविंद्र वलवे, गोविंद मोरे, पोकॉ गणेश शिंदे, राहुल क्षिरसागर यांनी व अन्न् व औषध प्रशासन अधिकारी श्री पवार, श्री सुर्यवंशी, श्री बडे यांनी केली आहे.
अकोले पोलीस स्टेशन हददीमध्ये कुठल्याही स्वरुपाचे बनावट दुध भेसळ माहीती दिसुन आल्यास त्याबाबत अकोले पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन अकोले पोलिसांनी केले आहे.
Tags :
21829
10