महाराष्ट्र
555
10
लहान मुलासोबत प्रौढ व्यक्तीने केले अनैसर्गिक कृत्य
By Admin
लहान मुलासोबत प्रौढ व्यक्तीने केले अनैसर्गिक कृत्य
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
तेरा वर्षाच्या मुलासोबत प्रौढ व्यक्तीने अनैसर्गिक कृत्य केल्याची घटनासमोर आली. विशेष म्हणजे, मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणारी ही व्यक्ती लष्करी गणवेश परिधान केलेली होती, असे तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अहमदनगर शहराच्या सावेडी उपनगरातील आठरे पाटील पब्लिक स्कूल रोडवर ही घटना बुधवारी घडली आहे.
तेरा वर्षाचा हा अल्पवयीन पीडित मुलगा सायकलीवरून घराकडे चालला होता. त्यावेळी लष्करी गणवेश परिधान केलेल्या आणि रस्त्याने चाललेल्या या अनोळखी व्यक्तीने त्याला थांबविले. मुलाला थांबविणारी ही व्यक्ती प्रौढ होती. आदित्य, असे नाव सांगून "मै आर्मीवाला हू", असेही सांगितले. येथील गॅरेजवर गाडी दुरुस्तीचे काम चालू असल्याचेही बतावणी त्याने केली. येथे लघुशंका करू शकतो का, अशी विचारणा केल्यावर मुलाने हो, म्हणून सांगितले. त्यावर लष्करी गणवेश परिधान केलेले त्या प्रौढ व्यक्तीने मुलाच्या हातातील सायकल हिसकावून घेत ती खाली पडली आणि मुलाला रस्त्याकडेला असलेल्या काटवनात घेऊन गेला. तिथे त्या व्यक्तीने मुलाबरोबर अनैसर्गिक कृत्य केले. या प्रकाराची वाच्यता कुठे केल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शंभर रुपये देत तेथून ही व्यक्ती पसार झाली, असे मुलाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
लष्करी गणवेश परिधान केलेल्या व्यक्तीने लहान मुलांबरोबर केलेल्या अनैसर्गिक कृत्याने अहमदनगर शहरात खळबळ उडाली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. प्रभारी शहर पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, निरीक्षक ज्योती गडकरी यांनीही घटनास्थळी पाहणी केली. ही अनोळखी व्यक्ती कोण असेल, याचा शोध तोफखाना पोलिस युद्धपातळीवर घेत आहेत. तोफखाना पोलिसांनी याप्रकरणी भादवि ३७७, अनैसर्गिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच लैंगिक गुन्हापासून बालकांच्या संरक्षण (पॉक्सो) कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. दरम्यान लष्करी गणवेश परिधान केलेली या व्यक्तीविषयी अहमदनगर शहरातील मुले आणि त्यांच्या पालकांमध्ये भीती पसरली आहे.
Tags :

