आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या पाथर्डीत आरोग्य शिबीर- शिवशंकर राजळे
पाथर्डी- प्रतिनिधी
महाराष्ट्रातील तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पाथर्डी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या (दि.29) बुधवार रोजी सकाळी ११ वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पाथर्डी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी दिली.
ऊर्जा व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,माजी आमदार चंद्रशेखर घुले,प्रदेश सरचिटणीस अँड.प्रताप ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी सांगितले.
मोहरी रोडवरील निवासी मतिमंद विद्यालय व वसतिगृह येथील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे.यामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांची दंतरोग चिकित्सक डॉ.भाऊसाहेब लांडे व डॉ.निलेश माने हे तपासणी करणार आहेत.तसेच डॉ.दिपक देशमुख हे मुलांच्या आरोग्याची तपासणी करणार आहेत.तर हिमोग्लोबिन व रक्तातील साखर तपासणी हाय टेक लॅबचे संचालक पांडुरंग काकडे यांच्याकडून केली जाणार आहे.
त्याचप्रमाणे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,व उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर कोविड लसीकरणाचे काम करणाऱ्या नर्सेस चा १ लाखांचा अपघाती विमा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उतरविणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी दिली.तसेच या कार्यक्रमाला कोरोनाचे सर्व नियम पाळून शहरासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राजळे यांनी केले आहे.