तिसगाव- चारित्र्याच्या संशयावरून मुलीला ठार मारल्या प्रकरणी पाच जण चौकशीसाठी ताब्यात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील घटने प्रकरणी चारित्र्याच्या संशयावरून पोटच्या गोळ्याला जीवे ठार मारून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्या प्रकरणी पोलिसांनी मृत मुलीच्या आई वडिलांसह पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामध्ये मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टराचाही समावेश आहे.
मंगळवारी सकाळी पोलिसांचा ताफा तिसगाव येथे धडकला. संबंधित कुटुंबाची झडती घेऊन घरातील सदस्यांची सुमारे दोन तास चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर चौकशीसाठी आई, वडील, आजोबा, भाऊ आणि डॉक्टर यांना पाथर्डीच्या पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. या घटनेमुळे तिसगाव परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून खरी घटना आहे. मात्र कोणी याबद्दल बोलण्यास तयार नाही.