दिलीप गांधींचा पाठपुरावा आणि विद्यमान केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या आशिर्वादानंच नगरचा उड्डाणपूल
माजी नगरसेवक सुवेंद्र गांधींचं वक्तव्य!
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
माजी केंद्रीयमंत्री दिलीप गांधी यांनी केलेली उड्डाणपुलाच्या घोषणेबाबत विरोधकांनी आमच्यावर टीका करत माजी केंद्रीय मंत्री गांधींची ही घोषणा हसण्यावारी नेली होती. मात्र त्यांनीच अखेरपर्यंत केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आशिर्वादानेच आज हा उड्डाणपूल प्रगतीपथावर आहे, असं वक्तव्य माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी केलंय.
नगर शहरात सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची माजी नगरसेवक गांधी यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘शहरवासियांच्या जिव्हाळ्याचा असलेला हा उड्डाणपूल लवकरच पूर्णत्वास येणार आहे. २०१५ साली जानेवारी महिन्यातच जेव्हा तत्कालिन खासदार व माझे वडील माजी केंद्रीयमंत्री दिलीप गांधी यांनी नगर शहरामधील रद्द झालेल्या उड्डाणपुलास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करुन विशेष मंजुरी आणली
नगर दक्षिण मतदार संघातील विविध रस्त्यांच्या व रेल्वेच्या कामांनाही १८ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे त्यावेळी माजी केंद्रीयमंत्री गांधी यांनी त्यावेळी जाहीर केले हाेते. उड्डाणपुलावर प्रत्यक्ष गेल्यावर या पुलाची भव्यता दिसते.
नगर शहराच्या विकासाचा राजमार्ग असलेल्या या उड्डाणपूलाचे काम पाहून अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी व्यक्त केली.
माजी नगरसेवक गांधी यांनी उड्डाणपुलाचे काम पाहणारे प्रमुख साईट इंजिनियर गजानन शेळके यांच्यासह उड्डाणपुलावर जाऊन पुलाच्या कामाची पाहणी केली. अभियंता शेळके यांनी उड्डाणपुलाच्या कामाची सविस्तर माहिती दिली.