महाराष्ट्र
388
10
बकर्या वाटपावरुन झालेल्या जोरदार भांडणातून एकाचा खून
By Admin
बकर्या वाटपावरुन झालेल्या जोरदार भांडणातून एकाचा खून
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बकर्या वाटपावरुन झालेल्या जोरदार भांडणातून राहता तालुक्यातील शिंगवे येथे एका व्यक्तीने त्याच्या सख्या भावाचा खून केला. ही घटना काल, शुक्रवारी सायंकाळी चार वाजता घडली आहे. जालिंदर रमेश मोरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र बाबुराव मोरे (रा. शिंगवे ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून महेंद्र रमेश मोरे याच्या विरुध्द खुनाचा गुन्हा राहाता पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.
जालिंदर मोरे व त्याचा भाऊ महेंद्र मोरे यांना दारुचे व्यसन होते. त्यांच्या आई वडिलांच्या २४ ते २५ बकर्या आहेत. त्या बकर्यांच्या वाटणीवरुन दोघांचे सतत भांडण होत असे. चार महिन्यापुर्वी या दोघांचे भांडण झाले होते. यात जालिंदरने महेंद्र यास मारहाण केली होती. त्यात महेंद्रचा पाय मोडला होता. तसेच वारंवार दोघेही आईवडिलांकडे पैसे मागत होते. काल, सायंकाळी राजेंद्र बाबुराव मोरे यास सायंकाळी चार वाजता गावात राहाणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, गावठाण जागेत असेलेले नवीन लक्ष्मीआईचे मंदिरासमोर तुझा चुलत भाऊ जालिंदर याचा खून झालेला आहे. त्यानंतर राजेंद्र मोरे हा त्याचा मित्र योगेश पगारे याला सोबत घेऊन घटनास्थळी गेला. त्यावेळी जालिंदर रमेश मोरे (वय २२) याच्या गळ्यावर कोणत्यातरी तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याचा खून करण्यात आला होता. जालिंदर मोरे व त्याचा मोठा भाऊ महेंद्र मोरे यांचे शुक्रवारी सकाळीच बकर्याच्या वाटणीवरुन भांडण झाले होते. त्यानंतर दुपारी दोघे दारु पिऊन लक्ष्मीआई मंदिरासमोर आपआपसात भांडण करीत होते. त्या भांडणातूनच जालिंदर याला महेंद्र याने कोणत्यातरी तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करुन त्यात जागीच ठार केले, असेही पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास राहाता पोलिस ठाण्याचा प्रभारी चार्ज घेतलेले साई मंदिर सुरक्षाचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी हे करीत आहेत.
Tags :

