महाराष्ट्र
नराधम पित्याचा आपल्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार!
By Admin
नराधम पित्याचा आपल्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार!
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
संतापजनक घटनेने संगमनेर हादरले; शहर पोलिसांनी आरोपीला केले गजाआड..
पत्नी बाहेरगावी गेल्याचे निमित्त साधून नराधम पित्याने आपल्याच पोटच्या अवघ्या साडेअकरा वर्षाच्या मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन ‘त्या’ नराधमाविरोधात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला असून बुधवारी रात्रीच त्याला गजाआड करण्यात आले आहे. आज दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 4 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे. सदर नराधमास दोन मुली आणि एक मुलगा असून त्याला दारुचे व्यसन असल्याची माहितीही समोर आली आहे. या संतापजनक घटनेने संपूर्ण संगमनेर तालुका हादरला आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहराच्या पश्चिमेकडील मोठ्या वसाहतीच्या भागात सदरची घटना घडली. या परिसरात राहणारा 37 वर्षीय तरुण एका खासगी शाळेतील विद्यार्थी वाहण्याचे काम करीत होता. मात्र गेल्यावर्षी देशभरात कोविडचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर शाळा बंद झाल्याने तो बेकार होता. या दरम्यान त्याला दारुचे व्यसनही जडले. त्यातूनच त्या दोघा पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत, आपला नवरा काहीच कामधंदा करीत नाही व दारु पितो म्हणून त्याची पत्नी त्याला सोडूनही गेली होती. त्यानंतर सदरच्या तरुणाने एका खासगी दुध डेअरीमध्ये नोकरी पत्करली, मात्र त्याचे दारुचे व्यसन मात्र सुटले नाही.
याच दरम्यान गेल्या 22 जुलै रोजी पत्नी माहेरी निघून गेल्याचे निमित्त साधून दारुच्या नशेत तर्रर असलेल्या ‘त्या’ नराधमाची नजर आपल्या अवघ्या 11 वर्ष 5 महिन्याच्या अल्पवयीन मुलीवर पडली. त्याच दिवशी रात्री त्याने बळजोरीने आपल्याच पोटच्या मुलीवर शारीरिक अत्याचार केले. आपलाच पिता आपला वैरी झाल्याच्या प्रसंगातून सावरण्याआधीच त्या नराधमाने पुन्हा 28 जुलै रोजी व त्यानंतरही तिच्यावर अशाच पद्धतीने अत्याचार केले. आपल्या जन्मदात्याकडून अत्याचाराचा प्रकार वारंवार घडू लागल्याने असहाय्य झालेल्या त्या लहानशा जीवाने अखेर आपल्या आईला आपबीती सांगितली. हा सगळा प्रकार ऐकून त्या माऊलीच्या तर पायाखालची जमीनच सरकली.
आपल्या मुलीवर बापाकडूनच होत असलेला अत्याचार ऐकून बुधवारी (ता.29) सदर महिला तातडीने संगमनेरात आली व रात्री उशीराने तिने आपल्या अल्पवयीन मुलीसह थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना घडला प्रकार सांगितला. सदर मुलीच्या वैद्यकीय तपासणीचे सोपस्कार पूर्ण करुन त्यांनी सदर अभागी मुलीच्या आईने सांगितल्यानुसार फिर्याद नोंदवून तत्काळ आरोपीच्या मुसक्या आवळल्या व त्याला गजाआड केले. आज दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार असून पोलिसांकडून त्याच्या कोठडीची मागणी केली जाणार आहे. संपूर्ण तालुक्यात संताप निर्माण करणार्या या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आरोपीला आज दुपारी संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने 4 ऑक्टोबरपर्यंत त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.
सदर नराधमाच्या बाजूलाच त्याचा मोठा आणि लहान भाऊ स्वतंत्रपणे राहतात. मोठ्या भावाकडे आई-वडील दोघेही वास्तव्यास असून त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने सध्या ते दोघेही अंथरुणावर आहेत. आपल्या मधल्या भावाला दारुचे व्यसन जडल्यानंतर ‘त्या’ पती-पत्नींमध्ये दररोज भांडणे होत. काहीवेळा त्याच्या भावांनी त्यात मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्याच्या व्यसनात व वागण्यात कोणताही बदल होत नसल्याने रोजच्या त्रासाला वैतागून सहा महिन्यांपूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. जाताना तिने आपल्या दोन मुलांसह पीडितेलाही सोबत नेण्याची तयारी केली होती. मात्र हे सगळे निघून गेले तर आपल्या दारुड्या भावाला कोण जेवायला घालील या स्वार्थी विचाराने त्यांनी पीडितेला तिच्या आईच्या माहेरी जाण्यास विरोध दर्शविला होता अशीही माहिती आता समोर येत आहे.
तर ही घटना टळली असती?
सदर नराधमाची पत्नी सहा महिन्यांपूर्वीच त्याला सोडून माहेरी निघून गेली होती, जाताना तिने आपल्या ‘या’ मुलीलाही सोबत नेण्याची तयारी केली होती. मात्र हे सगळे येथून निघून गेल्यास आपल्या व्यसनी भावाची जबाबदारी आपल्यावर येईल व त्याला रोज आपल्यालाच जेवण घालावे लागेल या विचाराने त्याच्या दोन्ही भावांनी पीडितेला सोबत नेण्यास विरोध केला होता. त्याला न जुमानता ‘त्या’ माऊलीने आपल्या पोटचा गोळा सोबत नेला असता तर कदाचित आज समोर आलेली ही दुर्दैवी घटना टाळता आली असती अशी चर्चा परिसरात सुरु आहे
Tags :
9323
10