श्री संत ज्ञानेश्वर महाराज सेवा धाम पंचम वर्धापन दिनानिमित्त दीपोत्सव
By Admin
श्री संत ज्ञानेश्वर महाराज सेवा धाम पंचम वर्धापन दिनानिमित्त दीपोत्सव
भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील माळीबाभुळगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज सेवा धाम येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे प्रदेशाध्यक्ष ह. भ. प. अनिल महाराज वाळके यांनी केले होते. त्यानिमित्ताने श्री संत सेवा धाम पंचम वर्धापन दिनाचे औचित्य साधून ह.भ.प. धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते जिल्हाध्यक्ष नाशिक, श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज तसेच शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या उपस्थितीत दीपोत्सव साजरा करण्यात आला.
दीपोत्सवाचा हा कार्यक्रम २३ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते यांच्या सातव्या कीर्तन सेवेनंतर करण्यात आला. त्यावेळी उपस्थित सर्व भक्तांकडे पेटती मेणबत्ती हातात घेऊन हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराजांच्या अमृतवाणीने आशीर्वचन झाले. तसेच ह. भ. प. निवृत्ती महाराज, उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, ह. भ. प. अनिल महाराज वाळके,प्रा. सुभाष शेकडे यांनी मनोगत व्यक्त केले.
दीपोत्सव म्हणजे दीप जसा जळतजळत उजेड देतो, तसे संत स्वतः कष्ट सहन करीत जगाच्या उद्धाराचे कार्य करतात. देह कष्टविती परोपकारी! या तुकोबांच्या वचनाप्रमाणे संतांचे कार्य असते. संत सेवाधामचे महत्वाचे कार्य म्हणजे पवित्र ज्ञानदान व अन्नदान आहे.
यानंतर अमरापूरचे सरपंच विजय पोटफोडे व ग्रामस्थांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. शेवटी पाथर्डी येथील संत कृपा भजनी मंडळाचे हरिजागर झाले.
गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी ह. भ. प. महेश महाराज हरवणे यांच्या काल्याच्या कीर्तनाने व श्रीमंत आदिनाथ महाराज शास्त्री, तारकेश्वर गड यांच्या आशिर्वचनाने महोत्सवाची सांगता झाली.
दरम्यान जगदंबा चारीटेबल ट्रस्ट, विजय केसवड, उद्योगपती आणि कोलते वस्ती, डांगेवाडी तलाव यांचे कडून उपस्थित भक्तांना महाप्रसादाचे महत्त्वाचे अन्नदान करण्यात आले.