गणोरे येथे अंबिका मातेच्या मंदिरातील दानपेटी फोडली
By Admin
गणोरे येथे अंबिका मातेच्या मंदिरातील दानपेटी फोडली
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील गणोरे येथील अंबिका मातेचे मंदिर असून अंबिका मातेच्या मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दानपेटी फोडली
गणोरे येथील अंबिका मातेच्या मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली या बाबत सकाळी मंदिर समितीच्या विश्वस्त मंडळ यांच्या लक्षात आले त्यानुसार त्यांनी अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली अकोले पोलीस पोलिसांनी सदर घटनास्थळाचा पंचनामा केला अंबिका माता देवस्थानचे अध्यक्ष श्री रामनाथ दातीर,उपाध्यक्ष दत्तात्रय आंबरे, श्री बाळासाहेब आहेर, अंबादास दातीर,अशोक आहेर, रामा आंबरे,भाऊसाहेब चव्हाण, मंदिराचे पुजारी घोसाळे बाबा आदी पंचनामा करताना उपस्थित होते.
घटनास्थळी मंदिरात चोरट्यांनी अंबिका मातेचे समोरील प्रवेशद्वारावरील कुलूप तोडून आत प्रवेश केला , मंदिरातील सी सी टी वी चे नुकसान करत मंदिरातील तीन दानपेट्या कटर च्या मदतीने कापून दानपेटीत असलेले पैसे चोरले तसेच मंदिराच्या मागील गेटचेही कुलूप तोडून टाकल्याचे लक्षात आले, चोरट्यांनी रात्री च्या पावसाचा फायदा घेत मंदिरातील दानपेटी वर हात साफ केल्याचे आढळून आले
मंदिराच्या आवारात सी सी टी व्ही अद्यावत असण्याची नितांत गरज असून या भागात सी सी टी वी बसवणे गरजेचे झाले आहे.याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली आहे असे प्रथमदर्शनी समजते कारण गावातील ग्रामपंचायत ने बसवलेल्या वेगवेगळ्या भागातील सी सी टी वी त संशयित व्यक्ती,गाडी,अथवा हालचाली आढळून आल्या नाही. एका दृष्टीने संपूर्ण अभ्यास करून चोरी केल्याची शंका बळावत आहे. अंदाजे एकूण पन्नास हजारांहून अधिक रक्कम चोरी झाल्याची प्राथमिक माहिती विश्वस्त मंडळ यांकडून समजली आहे.
अकोले पोलिसांनी लवकरात लवकर या चोरीचा तपास करावा अशी मागणी अंबिका माता देवस्थानचे विश्वस्त मंडळ आणि गावकऱ्यांनी केली आहे. तसेच गावात रात्रीची पोलिसांची गस्त सुरू होणे गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूला काही संशयित व्यक्ती आढळून आल्यास अथवा संशयी हालचाली आढळून आल्यास तत्काळ पोलीस प्रशासनास माहिती द्यावी .
अकोले पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार श्री वलवे, श्री गोंदे आणि श्री पटेकर यांनी पंचनामा केला असून लवकरात लवकर आरोपी पकडू असे अकोले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी सांगितले. घटनेचा पुढील तपास मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस करीत आहे.