मान्सूनचा पाऊस आला अंदमानात,महाराष्ट्रात येणार 15 ते 20 जून दरम्यान
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 21 मे,शुक्रवार
भारताच्या पश्चिम किनारपट्टीला तौक्ते चक्रीवादळ धडकल्यानंतर आता मान्सूनची प्रतीक्षेत आहे. यापूर्वीच हवामान विभागाने 21 मे रोजी अंदमानात मान्सून धडकणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार मान्सून वेळेत अंदमानात दाखल झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 1 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 21 जूनला नैऋत्य मोसमी वारे हे अंदमान बेटांवर पोहोचले असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे निकोबार बेट, बंगालचा उपसागर, संपूर्ण अंदमान आणि उत्तर अंदामानाच्या काही भागात मान्सूनचा परिणाम दिसून येत आहे. पुढील 48 तास हा परिणाम दिसून येईल, असेही सांगितले जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 जून रोजी मान्सून केरळात दाखल होणार आहे. सध्या मान्सूनसाठी वातावरण पोषक आहे. परिणामी जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळ, त्यानंतर 10 जूनपर्यंत तळकोकणात मान्सून दाखल होऊ शकतो. त्यानंतर 15 ते 20 जूनदरम्यान उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनच्या सरी बरसतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.