मुंगूसवाडे येथे श्री श्री १००८ विजय गिरीजी महाराजांच्या आगमनानिमित्त विविध कार्यक्रम
विविध तालवाद्यांच्या गजरात स्वागत
महंत योगीराज महाराज रामगडकर यांचे सुश्राव्य कीर्तन
पाथर्डी प्रतिनिधी:
तालुक्यातील मुंगूसवाडे येथील दशनाम संन्यासमठ येथे मंगळवार दि. ३० डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता श्री श्री १००८ सचिव पंचयात महानिर्वाणी आखाडा कणखर हरिद्वार विजय गिरीजी महाराज यांचे माऊली मंदिर संभाजीनगर (मुंगूसवाडे) येथे आगमन होणार आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळ चार वाजता टाळ- मृदुंग वाद्य, लेझीम, ढोल वाद्यांच्या गजरात विजय गिरीजी महाराज यांची मिरवणूक होऊन त्यांना पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात येणार आहे. तसेच भालदार- चोपदार, पताका यांचे आगमनानिमित्त सुशोभीकरण होईल.
बुधवार दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते नऊ या वेळेत येथील पावन हनुमान मंदिर इनाम येथे ह.भ.प. दयानंद महाराज कोरेगावकर यांचे प्रवचन होईल आणि रात्री ९ ते ११ महंत योगीराज महाराज रामगडकर यांचे सुश्राव्य कीर्तन होईल आणि त्यानंतर राम मंदिराचे भूमी पूजन होईल. तरी या सर्व कार्यक्रमास पंचक्रोशीतील भावीक- भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दशनाम संन्यास मठाचे महंत शुक्ल भारती बाबा यांनी केले आहे.