राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवशंकर राजळे यांच्या वाढदिवसानिम्मित पाथर्डी पोलीस स्टेशन येथे पोलिसांना मास्क वाटप
नगर सिटिझन live टिम -
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील माजी जिल्हा परीषद सदस्य व राष्टवादीचे ज्येष्ठ नेते शिवशंकर राजळे यांनी आपल्या वाढदिवसानिम्मित पाथर्डी तालुक्यातील कोविड सेंटर येथे भेट दिली.तसेच येथील रुग्णांना फळे व सकस आहाराचे वाटप केले. तसेच कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्या रुग्णांची विचारपूस केली.तसेच त्याच्याशी संवाद साधून त्याच्या समस्या अडचणी जाणून घेवून तब्येतेची चौकशी केली.तसेच तालुक्यातील पोलीस प्रशासन यंञणेस भेट देवून त्यांना मास्क वाटप करण्यात आले.यावेळी राष्टवादीचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत मरकड तसेच इतर कार्यकर्ते व सहकारी मिञ उपस्थित होते.