महाराष्ट्र
मतीमंद विद्यालयात घरफोडी करणारे जेरबंद
By Admin
मतीमंद विद्यालयात घरफोडी करणारे जेरबंद
१ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील डॉ. देवेंद्र ओहोरा निवासी मतीमंद विद्यालयात अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या लिपीक कार्यालयाचे दरवाजाचे कुलूप तोडून अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील डॉ. देवेंद्र ओहोरा निवासी मतीमंद विद्यालयात अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या लिपीक कार्यालयाचे दरवाजाचे कुलूप तोडून २ लाख ५४ हजार ४५७ रूपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याबाबत प्रविण शंकर थोरात (रा. वडगाव पान, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घडलेल्या घटनेबाबत पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांना याबाबत तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि तुषार धाकराव व पोलीस अंमलदार फुरकान शेख, अमृत आढाव तसेच मनोज गोसावी,
रमीझराजा अत्तार विशेष पथक श्रीरामपूर यांच्या पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक केले. पथक संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीतील सराईत गुन्हेगारांची माहिती घेत असताना दि.१५ रोजी पोसई धाकराव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा प्रेम विजय
त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सुमित रमेश उडीतके (रा. अमृतनगर साखर कारखाना कॉलनी, संगमेनर), प्रेम विजय वाल्हेकर (रा. आठरापगड, गुंजाळवाडी, ता. संगमनेर) व शुभम धिरज पारचे (रा. अमृतनगर साखर कारखाना कॉलनी, संगमनेर) असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे सदरच्या गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा दि.११ते १२ ऑक्अरोजी पहाटेच्या दरम्यान दोन मोटारसायकलवर जाऊन प्रेम वाल्हेकर याने शाळेच्या कंपाऊंडवरवरून उडी मारून शाळेचे कुलूप तोडून केला असल्याचे सांगीतले.
वाल्हेकर (रा. आठरापगड, गुंजाळवाडी, ता. संगमनेर) याने त्याच्या साथीदारासह केला असुन ते सध्या साखर कारखाना कॉलनी, संगमनेर येथे थांबलेले आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने साखर कारखाना कॉलनीमध्ये जाऊन संशयीत आरोपीचा शोध घेऊन ३ संशयीत इसमांना ताब्यात घेतले.
त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ९० हजार रूपये रोख व १५ हजरांचे तिन मोबाईल असा एकूण १ लाख ३५ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जपज केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर वैभव कलुबमें, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग कुणाल सोनवणे यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
Tags :
56604
10