महाराष्ट्र
लाडक्या बहिणीची नोंदणी झाली बंद
By Admin
जिल्ह्यात १२ लाख अर्ज दाखल: मंजूर लाभार्थ्यांना पैसे मिळणार
लाडक्या बहिणीची नोंदणी झाली बंद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
लाडकी बहीण
योजनेसाठीची नोंदणी १५ ऑक्टोबरपासून बंद करण्यात आली आहे. ज्या महिलांनी यापूर्वी आपला अर्ज दाखल केला आहे व पात्र ठरला आहे. त्या महिलांच्या बँक खात्यावर रक्कम झाल्या आहेत. अर्ज मंजूर झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या बैंक खात्यावर पुढील महिन्याचा हप्तासुद्धा जमा होत आहे. आचारसंहिता लागण्याची आणि योजनेत अर्ज करण्याची अंतिम मुदत या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी आल्या, हा योगायोग की नियोजन होते, याची चर्चा आता सुरू आहे.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर महिलांना अडचणी येऊ नये म्हणून आचारसंहितेपूर्वीच हप्ता जमा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पहिल्या
१५ ऑक्टोबरपासून नोंदणी बंद
महिला व बालकल्याण विभागाकडून ही योजना राबविण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु त्यानंतर आणखी पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्यानंतरही कागदपत्रे सादर न करणाऱ्या महिला योजनेपासून वंचित आहेत.
टप्प्यात म्हणजेच जुलै व ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेल्या महिलांच्या बँक खात्यावर तीन हजार जमा झाले होते.
पुढे सप्टेंबर महिन्यात अर्ज
शिल्लक राहिलेल्या बहिणी वंचित
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठीची नोंदणी करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर होती. अनेक महिलांचे अर्ज भरायचे असल्याने १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी राहिलेल्या महिलांची संख्या अत्यल्प असू शकते, असा अंदाज आहे. ज्यांनी आतापर्यंत अर्ज भरला नाही, त्यांना यापुढे अर्ज भरता येणार नाही.
१२ लाख अर्ज पात्र
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील मंगळवारअखेर १२ लाख अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ११.९१ लाख अर्ज मंजूर झाले असून सर्वच महिलांच्या बँक खात्यांवर हप्ते जमा झाले आहेत. ज्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाली नाही, त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होत आहे.
भरलेल्या महिलांच्या बँक खात्यावर ४५०० रुपये जमा झाले होते. तसेच पहिल्या टप्प्यात अर्ज भरलेल्या लाभार्थी महिलांच्या खात्यावर सप्टेंबर महिन्यात एकाचवेळी तीन
हजार जमा झाले होते. सप्टेंबरअखेर ज्यांनी अर्ज भरले होते, त्या महिलांच्या बँक खात्यावर ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पैसे जमा झाले आहेत.
Tags :
66944
10