आदर्श शिक्षक अंबादास लाड संघर्षयॊद्धा पुरस्काराने सम्मानित
पाथर्डी प्रतिनिधी:
तालुक्यातील पागोरी पिंपळगांव येथील रहिवाशी व सध्या सच्चिदानंद बंडोबा महाराज माध्य. विदयालय दुले चांदगाव ता. पाथर्डी येथे कला शिक्षक म्हणुन कार्यरत आसणारे अंबादास लाड यांना नुकतेच बोधेगांव येथे भगवानबाबा मंगल कार्यालयात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात बहुभाषिक भाऊबाबा वंजारी संघ महाराष्ट यांच्या वतीने कला क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल राज्यस्तरीय संघर्षयोद्धा पुरस्काराने समाजसेवक तथा जेष्ठनेत्या शुशीलाताई मोराळे, बहुभाषिक भाऊबाबा वंजारी संघ महाराष्ट अध्यक्षा लक्ष्मीताई गर्कळ व सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी अविनाश बुधवंत यांच्या हस्ते सम्मानीत करण्यात आले.
अंबादास लाड यांना संघर्ष योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री यशवंत ग्रामसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी अप्पर जिल्हाधिकारी तथा आमदार शिवाजीराव गर्जे,सचीव अॅड. अंकुशराव गर्जे, मुख्याध्यापक मदन चन्ने, शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.
अंबादास लाड यांना राज्यस्तरीय संघर्षयोद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल पागोरी पिंपळगाव येथील ग्रामस्थ व शिक्षक वर्गातुन सर्वत्र अभिनंदन होत आहे.