महाराष्ट्र
36942
10
मा .आ .राजीवजी राजळे यांच्या जयंतीनिमित्त कृषी विद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन
By Admin
मा .आ .राजीवजी राजळे यांच्या जयंतीनिमित्त कृषी विद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन
पाथर्डी तालुका-
पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर, दि. ५ डिसेंबर
माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या ५६ व्या जयंतीनिमित्त आज आदिनाथनगर येथील डॉ . अण्णासाहेब शिंदे कृषि तंत्र विद्यालयात सुंदर अशा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. “ निसर्ग संवर्धन आणि शेतकरी सक्षमीकरण” या स्व . आमदार राजीव राजळे यांच्या आवडत्या विषयांना केंद्रस्थानी ठेवून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .
याप्रसंगी कृषी तंत्र विद्यालयाच्या मध्यवर्ती परिसरात उभारण्यात आलेल्या दीपस्तंभास अभिवादन करण्यात आले .
रांगोळी स्पर्धेचे उदघाटन शिक्षण संस्थेचे विश्वस्त बाबासाहेब किलबिले, विश्वस्त राहुल दादा राजळे यांचे शुभहस्ते झाले .
या रांगोळी स्पर्धेत कृषि तंत्र विद्यालयातील २४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रांगोळींमध्ये पिकांच्या पेरणीसाठी करावयाची पूर्वमशागत, बिजप्रक्रिया, आधुनिक सिंचन प्रणाली, सेंद्रिय खत व्यवस्थापन, पिकांवरील किड रोग ओळखणे , ड्रोन तंत्रज्ञान , लक्षणे ओळखून पिकांची काढणी करणे ,पॉलीहाऊस मधील गुलाब शेती , मधमाशी पालन, भाजीपाला रोपवाटीका , पशुपालन , कृषी पदविकाधारक विद्यार्थ्यांसाठी स्वयंरोजगार म्हणून कृषि सल्ला व सेवा केंद्र अशा विविध संकल्पना साकारण्यात आल्या. विशेष म्हणजे बहुतांश रांगोळ्या नैसर्गिक रंग (हळद, फुलांच्या पाकळ्या, भुसार , माती ) वापरून तयार करण्यात आल्या होत्या.
यावेळी शिक्षण संस्थेचे जेष्ठ विश्वस्त रामकिसन काकडे यांनी स्व .आ .राजीव राजळे यांच्या जयंतीनिमित्त कृषी तंत्र विद्यालयाने आयोजित केलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले . पिकांच्या संदर्भातील पेरणीसाठी आवश्यक असणाऱ्या पूर्व मशागत ते काढणीपर्यंतचे सर्वांगीण तंत्रज्ञान कृषीच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या वेगवेगळ्या रांगोळ्यातून दिसून आले . विद्यार्थ्यांनी यावेळी मान्यवरांना रांगोळीच्या विषया बाबत स्पष्टीकरण दिले .
रांगोळी स्पर्धा व कृषि विद्यालयातील उपक्रमास शिक्षण संस्थेचे विश्वस्त डॉ .यशवंतराव गवळी , विश्वस्त श्रीकांत मिसाळ , शिक्षण संस्थेचे सचिव आर. जे . महाजन , मार्गदर्शक शिवाजीराव राजळे , डॉ .विनायकराव हाडके , आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव भास्करराव गोरे , विक्रमराव राजळे , लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ .एस .जी.खणगे , संगणक विभागप्रमुख चंद्रकांत पानसरे , गणेश सोनटक्के ,संदीप लोखंडे आदी मान्यवरांनी भेट दिली व कृषि विद्यालयातील विविध उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले . यावेळी कृषी तंत्र विद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. ऋतुजा पुरनाळे, प्रा. नामदेव मरकड , प्रा .संभाजी मरकड , विद्यार्थी प्रतिनिधी मुक्तेश्वर कासार , ओंकार मरकड आदींनी परिश्रम घेतले.
Tags :
36942
10




