महाराष्ट्र
180645
10
माध्यमिक विद्यालय धामणगाव शालेय मंत्रिमंडळ निवडणूक बॅलेट पद्धतीने संपन्न
By Admin
माध्यमिक विद्यालय धामणगाव शालेय मंत्रिमंडळ निवडणूक बॅलेट पद्धतीने संपन्न
धामणगाव न्यूज नेटवर्क
मंगळ वार, दिनांक 22 जुलै 2025 रोजी इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील माध्यमिक विद्यालय धामणगाव, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक या विद्यालयात शैक्षणिक वर्षे 2025 - 26 या वर्षातील शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक भारतीय लोकशाही पद्धतीने पार पडली. या निवडणुकीत पंतप्रधान, सांस्कृतिक मंत्री, शिस्त मंत्री, आरोग्य मंत्री,स्वच्छता मंत्री, अर्थमंत्री, परिपाठ मंत्री, अभ्यासमंत्री, पर्यावरण मंत्री, सहल मंत्री, क्रीडामंत्री या पदांसाठी निवडणूक घेण्यात आली.
उपस्थित सर्व विद्यार्थी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला कोणत्याही विद्यार्थ्यांनी शालेय निवडणूक आचारसंहितेचा भंग केला नाही.
मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून श्री. लहामगे जी. व्ही. सर व सहाय्यक निवडणूक आयुक्त श्री . पवार अविनाश सर, श्री. उगले डि. के. सर यांनी कामाची विभागणी केली व नियोजन केले मुख्य निवडणूक सल्लागार श्री. इंगळे सर, तंत्र सहायक श्री. गरुड एस. जे सर, भरारी पथक तथा निरीक्षक श्रीमती वैशाली निकम मॅडम, श्रीमती कदम मॅडम, श्रीमती पुंड मॅडम, श्रीमती जाधव यांनी कामकाज पाहिले. केंद्र अधिकारी 1 व 2 व पोलीस अधिकारी पदाचा कार्यानंद इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी घेतला त्यासाठी त्यांना सेवक श्री. देवरे मामा व श्री. पवळे मामा यांची मदत लाभली.
सदर निवडणुकीत विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री. आर.सी. देशमुख सर यांनी बोटाला शाई लावून , मतदान करून तसेच सेल्फी काढून मतदान प्रक्रियेचे उद्घाटन केले.
शालेय मंत्रिमंडळ निवडणूक निकाल
सदर मंत्रिमंडळ निवडणुकीत 30 विद्यार्थी उमेदवारांनी सहभाग घेतला, त्यापैकी 11 उमेदवार निवडून आले.
माध्यमिक विद्यालय धामणगावच्या 2025 - 26 च्या मंत्रिमंडळाची नावे
1) पंतप्रधान- कुमारी अक्षरा विष्णू गाढवे
2) सांस्कृतिक मंत्री - कुमारी मानसी दामोदर गुंजाळ
3) शिस्त मंत्री- आरुष नितीन गाढवे
4) स्वच्छता मंत्री- आर्यन कृष्णा शिंदे
5) आरोग्यमंत्री- शिवानी उत्तम गाढवे
6)अर्थमंत्री- केशव संतोष उगले
7)परिपाठ मंत्री- वैष्णवी विष्णू गाढवे
8) अभ्यास मंत्री- कोमल अशोक पाटेकर
9) पर्यावरण मंत्री - जितेंद्र विनायक गोडे
10) सहल मंत्री - रोहन सुनील गाढवे
11) क्रीडामंत्री - आर्यन ज्ञानेश्वर पानसरे
वरील सर्व मंत्रिमंडळाचा शपथविधी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री. आर.सी देशमुख सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला.
शालेय मंत्रिमंडळाच्या विद्यार्थ्यांचे व स्वयंसेवक भूमिका बजावलेल्या विद्यार्थिनींचे गुलाब पुष्प देऊन विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी स्वागत व सत्कार केला.
Tags :
180645
10





