महाराष्ट्र
पैसे घेऊन लग्र लावणारी टोळी उघड !
By Admin
पैसे घेऊन लग्र लावणारी टोळी उघड !
महिलेसह एकाचा पाठलाग; नवरदेवाच्या नातेवाइकांनी पकडले दोघांना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नातेवाईकांसह मध्यस्थीने दाखविलेल्या मुलीशी गावातच लग्न करण्यात आले, मात्र मुलीचे परत मुळ करण्याच्या बहाण्याने पसार होणाऱ्या टोळीचा पाठलाग करुन, एका महिलेसह पुरुषाला नाशिक रोड येथून पुन्हा गावात पकडून आणण्यात आले. दरम्यान, नवरीसह तिची मैत्रिण मात्र पसार झाली आहे. याप्रकरणी हा सिनेस्टाईल प्रकार तालुक्यातील चिकणी गावात घडल्याने उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.
चिकणी गावात एका कुटुंबातील मुलाचे लग्न करण्यासाठी मुली शोधण्याचा प्रयत्न आई- वडीलासह नातेवाईक करीत होते. गावातीलच विवाह जमविणाऱ्या काही मध्यस्थींनी जालना जिल्ह्यातील एक टोळीने मुलगी असल्याची माहिती दिली. लातुरची एक महिला व जालन्यातील एका पुरुषाचा यात समावेश आहे. नातेवाईक व मध्यस्थींची जालन्यातील विवाह
पोलिसांसह नागरिक अनभिज्ञ !
'नववधुसह रक्कम घेवून, पसार होणाऱ्या टोळीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. नवरदेवाच्या नातेवायिकांनी कुणालाच न कळविता परस्पर उद्योग केल्याने ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांसह गावातील नागरिक मात्र या घटनेपासून अनभिज्ञ आहेत. बनावट विवाह जमविणाऱ्या टोळीचे कारनामे उघडकीस आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
जमविणाऱ्या टोळीतील सदस्यांची बोलणी झाली. विवाह जमविण्याच्या बदल्यात मुलाकडून २.५० लाख रूपये देण्याचे ठरले. विवाह करण्यासाठी टोळीचे सदस्य मुलीला घेवून चिकणी येथे आले. मुलीला पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलाचे आई वडील व नातेवायिकांना मुलगी पसंद झाली.
यावेळी बोलणी होताच विवाह चिकणी येथे करण्याचे ठरले. तुळशी विवाहाच्या दिवशी गावातील मंदिरात विवाह पार पडला. तत्पूर्वी टोळीतील नातेवाईकांना २.५० लाख रुपये रोख
देण्यात आले. नोटांची चटक लागताच टोळीतील सदस्यांनी आणखी एका मुलीला जालना येथून बोलाविले. याही मुलीसाठी मुलगा पाहण्याचा कार्यक्रम दोन तीन दिवस चालला, मात्र अपेक्षित स्थळासह रकमेबाबत बोलणी फिस्कटली. दरम्यान, टोळीतील सदस्यांनी मुलीला गावी सोडण्यासाठी जायचे आहे, असे सांगत, तिच्यासोबत नव्या नवरीचेही परत मुळ करायचे आहे, असा बहाणा केला. टोळीतील दोघांसह दोन्ही तरुणी असे चौघेजण जालन्याला जाण्यासाठी पाच दिवसांपूर्वी संगमनेरहून नाशिकरोड रेल्वे
स्टेशनवर गेले, मात्र मुलांच्या नातेवायिकांना संशय आल्याने त्यांनी गावातील एक वाहन घेऊन, टोळीचा पाठलाग केला. नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर त्या सर्वांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, दोघेजण हाती लागले, मात्र दोन्ही मुली पळून जाण्यात यशस्वी ठरल्या. पकडलेल्या दोघांना परत चिकणी येथे आणण्यात आले. त्यांना मुलाच्या नातेवाईकांनी चांगलेच फैलावर घेतले. पोलिसांच्या ताब्यात देण्याची धमकी देताच, टोळीतील एका सदस्याने १.८० लाख रूपये परत केले. ते दोघेजण नवरदेवाच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहेत, अशी चर्चा सुरु आहे.
सध्या विवाह जमविण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. पुन्हा अशीच आणखी एक घटना तालुक्यात घडली, मात्र पोलिसांना याप्रकरणी काहीच माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Tags :
15467
10